rajkiyalive

sangli local news : सांगलीतील वकिलाने तयार केलेल्या कायद्याचे विधेयक संसदेत बहुमताने दाखल

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पाठिंब्याने दोन्ही सभागृहात हालचाली सुरू

sangli local news : सांगलीतील वकिलाने तयार केलेल्या कायद्याचे विधेयक संसदेत बहुमताने दाखल : कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. धनंजय मद्वाण्णा रा. सांगली यांनी गोपनीयता (Privacy) आणि व्होयोरिझम (Voyeurism) या विषयावर लिहिलेल्या 160 कलमांच्या कायद्याचे विधेयक राज्यसभेत काल दिनांक 07-02-2025 रोजी, आवाजी बहुमताने मंजुरी घेऊन मांडण्यात आले आहे (Bill is Introduced in the Rajya Sabha).

sangli local news : सांगलीतील वकिलाने तयार केलेल्या कायद्याचे विधेयक संसदेत बहुमताने दाखल

या विधेयकाला अनेक छानण्यांमधून (scrutiny) पुढे जाऊन राज्यसभेच्या दिनांक 07-02-2025 च्या कामकाजाच्या एजेंड्यावर स्थान मिळाले होते. सभागृहाने बहुमताने मंजुरी दिल्याने हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यास मान्यता मिळाली. त्यानुसार विधेयक मांडण्यात आले असून पुढील अधिवेशनापासून या विधेयकावर चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
अ‍ॅड. धनंजय मद्वाण्णा यांचे संशोधन पुस्तक काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापर्यंत पोहोचल्यावर श्री. खर्गे यांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत हे विधेयक *”प्रायव्हेट मेंबर्स बिल”* स्वरूपात मांडावे, असा अंतर्गत आदेश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिला होता.

कर्नाटकचे खासदार डॉ. सईद नसीर हुसेन यांनी हे विधेयक राज्यसभेत सादर केले आहे.

तसेच श्री. खर्गे यांच्या आदेशानुसार, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी केंद्रीय मंत्री आणि लोकसभा खासदार श्री. के. सी. वेणुगोपाल यांनी हे विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी संसद सचिवालयाकडे अर्ज केला होता. त्यानुसार सर्व छानण्या पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या एजेंड्यावर हे विधेयक  (Introduction) मांडण्यासाठी पोहोचले आहे.
अ‍ॅड. धनंजय मद्वाण्णा रा. सांगली हे  *”World Anti Voyeurism Forum (WAVF)”* या NGO चे संचालक आहेत. ही संस्था प्रायव्हसी, व्हायोरिझम, सायबर क्राईम या विषयावर संशोधन आणि जनजागृतीचे कार्य करते.
अ‍ॅड. धनंजय मद्वाण्णा यांनी अनेक वर्षे संशोधन करून लिहिलेले पुस्तक – *”YOU  ARE  BEING SECRETLY  WATCHED with Model Law on Privacy – The Voyeurism (Prevention, Prohibition and Redressal) Bill, 2024″*  हे पुस्तक WAVF या त्यांच्या संस्थेने प्रकाशित केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर, डीपफेक सॉफ्टवेअर, स्पाय कॅमेरे, हाय स्पीड इटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे आपली प्रायव्हसी धोक्यात आलेली असून व्यक्तीच्या प्रायव्हसीचा भंग हा प्रत्येक सायबर गुन्ह्याचे मूळ आहे.
प्रायव्हसी या विषयावर कोणत्याही देशात सर्वसमावेशक आणि स्वतंत्र कायदा (Act) अस्तित्वात नाही. त्यामुळे अ‍ॅड. ध्यानंजय मद्वाण्णा यांनी अनेक वर्षे सखोल अभ्यास करून 160 कलमांचे विधेयक तयार केले, ज्याचा मसुदा त्यांच्या पुस्तकाद्वारे प्रकाशित करण्यात आला.

त्याच मसुद्याचा स्वीकार करून हे विधेयक संसदेत सादर करण्यात आले आहे.

*सध्याचे काही केंद्रीय मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार यांनी देखील या विधेयकाला पाठिंबा दर्शवित, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री श्री. अमित शहा यांना पत्र पाठवले आहे.* लोक सभेतील विरोधी पक्ष नेते श्री. राहुल गांधी यांनी देखील पत्राद्वारे याविषयाला पाठिंबा दिलेला आहे.
सांगलीचे अपक्ष खासदार श्री. विशाल पाटील यांनी हे विधेयक कायद्यात रूपांतरित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिल्याचे अ‍ॅड. ध्यानंजय मद्वाण्णा यांनी सांगितले.

विधेयकाचे शीर्षक : The Voyeurism (Prevention, Prohibition and Redressal) Bill, 2024

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज