गोणीला सरासरी 250 रुपये वाढणार, नव्या वर्षापासून अंमलबजावणी
sangli local news : शेतकर्यांना झटका, ‘डीएपी’सह खते महागणार : शेतमालाच्या उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ घालताना कसरत करावी लागत असताना नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकर्यांना झटका बसणार आहे. रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना खतांचे दर वाढविण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. एक जानेवारीपासून शेतकर्यांना ’डीएपी’, 10ः26ः26, 13ः32ः16 या खतांची गोणी सरासरी 250 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना नवीन वर्षापासून जादा दराने खतांची खरेदी करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
sangli local news : शेतकर्यांना झटका, ‘डीएपी’सह खते महागणार
शेतकरी दरवर्षी 105 ते 110 लाख टनांच्या आसपास ’डीएपी’ विकत घेतात. मात्र बहुतेक खत कंपन्यांना डीएपी तयार करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. आंतरराष्ट्रीय खत बाजारात डीएपीच्या किमती गेल्या काही महिन्यांपासून भडकल्या आहेत. परंतु केंद्र शासनाने देशी खत कंपन्यांना डीएपीच्या किमती वाढविण्यास मान्यता दिलेली नाही. परिणामी, काही कंपन्या तोटा सहन करीत डीएपीचा पुरवठा करीत आहेत. उत्तर भारतातील शेतकरी नाराज होऊ नये म्हणून केंद्राने डीएपीच्या किंमत वाढीवर अंकुश ठेवला होता. परंतु आता राज्याराज्यांमधील निवडणुका आटोपल्यामुळे डीएपीच्या किमती मर्यादित प्रमाणात वाढविण्यास केंद्राने मान्यता दिली आहे.
नव वर्षाच्या सुरुवातीला एक जानेवारीपासून सर्वच कंपन्या सुधारित दराने डीएपी विकण्याची तयारी करीत आहेत. डीएपीची 50 किलोची गोणी सध्या बाजारात 1350 रुपयांना विकली जाते आहे. हीच गोणी 1550 ते 1575 रुपयांच्या आसपास मिळेल, असा अंदाज खत उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. याशिवाय 10:26:26 खत 255 रुपये, 12:32:16 खत 255 रुपये आणि टी. एस. पी. (46 टक्के) 50 रुपयांनी महागणार आहे.
डीएपीची किंमत वाढविण्यास केंद्र सरकार मान्यता देत नव्हते. त्यामुळे कंपन्यांनी आयात कमी केली. परिणामी, देशात काही महिन्यांपासून डीएपीचा तुटवडा जाणवतो आहे. त्याचा फायदा काळाबाजार करणार्या घटकांनी घेतला आहे. डीएपी तयार करण्यासाठी खत कंपन्यांना केंद्राकडून प्रतिटन 3500 रुपये अनुदान मिळते. हे अनुदान आता बंद केले जाणार आहे. अनुदानाऐवजी तुम्ही किमतीत मर्यादित प्रमाणात वाढ करा, अशी भूमिका केंद्राने घेतली आहे. यामुळे खत कंपन्यांना व्यावसायिक नियोजन करणे सोपे जाणार आहे. दरवाढीस मान्यता मिळाल्याने कंपन्यांकडून डीएपीचा पुरवठा वाढवला जाईल.
जिल्ह्यात डी.ए.पी. खताच्या वर्षाला तीन लाख 65 हजार बॅग लागतात. 10 : 26 : 26 खताच्या चार लाख बॅग लागतात, तर 12 : 32:16 खताच्या दोन लाख बॅग लागतात. या तीन खताच्या सुमारे साडेसहा लाख बॅगची मागणी असते. या तीन खतापोटी दर वाढल्यामुळे 20 कोटींचा भुर्दंड शेतकर्यांच्यावर पडणार आहे. दरम्यान कृषी विभागातील अधिकार्यांच्या मते डीएपीची विक्री किंमत प्रतिगोणी 240 रुपयांनी वाढण्याची चर्चा आहे. परंतु याबाबत केंद्र शासन अथवा खत उद्योगाकडून कृषी विभागाकडे कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
खताचा प्रकार मागील दर होणारी दर वाढ
डी. ए. पी. 1350 ते 1590 240
10:26:26 1470 ते 1725 255
12:32:16 1470 ते 1725 255
टी. एस. पी. (46 टक्के) 1300 ते 1350 50

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.