rajkiyalive

SANGLI LOKSABHA : चंद्रहार पाटील घेणार ठाकरेंची मशाल हाती

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI LOKSABHA : चंद्रहार पाटील घेणार ठाकरेंची मशाल हाती : सांगली ः सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करुन मशाल हाती घेणार आहेत. सेनेतील प्रवेशासाठी चंद्रहार पाटलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रवेशासाठी जिल्ह्यातून तब्बल 500 गाड्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सांगलीची काँग्रेसची जागा शिवसेनेला सुटण्याचे स्पष्ट संकेत आहेत. या कारणांनी महाविकास आघाडीतील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.

SANGLI LOKSABHA : चंद्रहार पाटील घेणार ठाकरेंची मशाल हाती

मुंबईत आज प्रवेश, जिल्ह्यातून कार्यकर्ते रवाना

मागील चार महिन्यांपासून चंद्रहार पाटील यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. कोणत्याही परिस्थिीतीत लोकसभा लढवण्याचा चंग बांधल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कातही ते होते. मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात सांगली मतदारसंघ शिवसेनेला (ठाकरे गट ) द्यावा, अशी भूमिका गटाने घेतल्यानंतर चंद्रहार पाटलांना मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. तेथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, तेथील चर्चेनंतर महाविकास आघाडीकडून सांगलीची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होते, परंतु काँग्रेस नेतेही सांगलीसाठी आग्रही राहिल्याने कोंडी निर्माण झाली होती.

अखेर चंद्रहार पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला आहे.

ते मुंबईत सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रहार यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यातून सुमारे 500 गाड्या
मुंबईकडे रवाना करण्याचा चंग बांधला आहे. त्याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. चंद्रहार यांच्या जवळचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यातून मुंबईला गाड्या नेण्याबाबतचे नियोजन करीत आहेत. रविवारी रात्री चंद्रहार यांच्यासह सर्व कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होतील.

ठाकरे यांनी सांगलीतून शिवसेनेकडून चंद्रहार पाटलांच्या नावाला समंती दर्शवली असल्याची माहिती

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार यांच्या शिवसेनेत प्रवेश होत असताना सांगली लोकसभा मतदारसंघ जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे यांनी सांगलीतून शिवसेनेकडून चंद्रहार पाटलांच्या नावाला समंती दर्शवली असल्याची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडीनेही चंद्रहार पाटील यांना पाठिंबा देत सांगली लोकसभा मतदारसंघातील आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला जागा गेल्यास काँग्रेसची भूमिका नेमकी काय राहणार याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत.

महाविकास आघाडीत पडणार वादाची ठिणगी

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात गतवेळी झालेल्या पराभव विसरुन यंदा जोरदार तयारी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अनेक कार्यक्रम घेऊन वातावरण निर्मिती केली. आता काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यास महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज