rajkiyalive

 SANGLI LOKSABHA : काँग्रेसने इच्छुकांची नावे मागवली

 SANGLI LOKSABHA : काँग्रेसने इच्छुकांची नावे मागवली
 SANGLI LOKSABHA  : लोकसभेसाठी काँग्रेसने इच्छुकांची नावे मागवली.  विशाल पाटील यांच्याबरोबर जितेश कदमांचे नाव?

 

 SANGLI LOKSABHA : काँग्रेसने इच्छुकांची नावे मागवली

जनप्रवास ।  सांगली :

SANGLI LOKSABHA  काँग्रेसने इच्छुकांची नावे मागवली : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून जागा वाटपावर चर्चा सुरू झाली आहे. सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. या मतदारसंघातून इच्छूक असलेल्या उमेदवाराची नावे प्रदेश काँग्रेसने मागितले असल्याचे वृत्त आहे.

जितेश कदमांच्या नावाचा देखील प्रस्ताव पुढे येऊ शकतो.

त्यामुळे सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील यांच्याबरोबर आणखी कोणाचे नाव प्रदेशकडे जाणार? याची चर्चा सुरू झाली आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघासह आ. विश्वजीत कदम समर्थकांकडून जितेश कदमांच्या नावाचा देखील प्रस्ताव पुढे येऊ शकतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील जागांची चाचपणी चालली आहे.

 

कोणत्याही पक्षाने जागा निश्चित केलेल्या नाहीत.

राज्यातील 48 जागांचा विचार केल्यास तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याचे संकेत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सरचिटणीस, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे मुख्यमंत्री व विधिमंडळ नेत्यांची गुरुवारी दिल्लीत बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात या बैठकीसाठी गेले होते. काँग्रेसने सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

हेही वाचा

hatkanagle loksabha : शिंदे गटाला कमळाचाच पर्याय?

प्रतीक पाटील मैदानात की शेट्टींवर दबावतंत्र…?

SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांनी पळ काढू नये

शरद मोहोळच्या अट्टल ’गुंडगिरी’चा प्रवास

समितीच्या माध्यमातून जागा वाटपाची चर्चा सुरू होणार आहे.

तरी देखील या बैठकीत सर्व जिल्हाध्यक्षांकडून राज्यातील इच्छुकांची नावे दि. 10 जानेवारीपर्यंत पाठवण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागांसाठीच्या इच्छुकांची यादी मागवली आहे. काँग्रेस नक्की स्वबळावर लढण्याची तयारी करतंय की आघाडीतील मित्रपक्षांवर दबाव टाकतंय? याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. सांगलीत मात्र यामुळे काँग्रेस रिचार्ज झाली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत यांनी मात्र अद्याप पत्र आले नसल्याचे सांगितले आहे. पण पत्राची वाट न बघता सांगलीतून इच्छुकांची नावे पाठविण्याची तयारी जिल्हा काँग्रेसने सुरू केली आहे.

 

लोकसभेसाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील तयारी करत आहेत.

त्यांनी लोकसभा मतदारसंघात प्रचार देखील सुरू केला आहे. महत्वाच्या व्यक्तिंच्या गाठी-भेठी त्यांनी घेतल्या आहेत. त्यामुळे सध्या जिल्हा काँग्रेसकडून त्यांच्या नावाला अधिक पसंती आहे. त्यांचे नाव प्रदेशकडे जाणार आहे. त्यांच्याबरोबर आणखी कोणाचे नाव जाणार का? याची चर्चा देखील काँग्रेसमध्ये सुरू आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यापूर्वी काँग्रेस भवनमध्ये आ. विश्वजीत कदम यांनी बैठक घेतली होती.

जितेश कदम यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती

या बैठकीत पलूस-कडेगावमधील कार्यकर्त्यांनी लोकसभेसाठी काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे भविष्यात दादा-कदम गटात उमेदवारीवरून वेगवेगळी नावे पाठविण्याचा निर्णय झाला तर जितेश कदमांचे देखील नाव जाऊ शकते. त्यामुळे लोकसभेला कोणाकोणाची नावे जाणार याची चर्चा सुरू आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज