rajkiyalive

SANGLI : सांगली लोकसभेच्या जागेबाबत पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत चर्चा

जनप्रवास । सांगली
SANGLI : सांगली लोकसभेच्या जागेबाबत पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत चर्चा : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेनेत (उबाठा) चढाओढ कायम आहे. सांगलीच्या बदल्यात काँग्रेसने राज्यातील इतर एका जागेबाबत तडजोडीची भूमीका घेतली आहे, पण शिवसेनेचा सांगलीचाच हट्ट कायम ठेवला आहे. मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीत रात्री उशीरापर्यंत हे खलबते सुरू होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी सांगलीच्याज जागेचा तोडगा काढणार आहेत.

 

SANGLI : सांगली लोकसभेच्या जागेबाबत पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत चर्चा

रात्री उशीरापयर्ंत खलबते: आज निर्णय होणार

राज्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटप व वंचित बहुजन आघाडीच्या जागांबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मुंबईत एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात, आ. सतेज पाटील, शिवसेनेचे (उबाठा) खा. संजय राऊत, राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने सांगलीच्या जागेबाबत पुन्हा चर्चा करण्यात आली.

सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगले वातावरण आहे.

भाजप विरोधी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकत्रित मोठ बांधली आहे. या परिस्थितीमध्ये पक्ष किंवा उमेदवार बदलला तर भाजपची एक जागा कमी करण्याची संधी विकास महाआघाडीच्या हातातून जाईल. त्यामुळे सांगलीचा हट्ट सोडावा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेकडे केली. पण पश्चिम महाराष्ट्रात एक तरी जागा सेनेला हवी आहे. कार्यकर्ते देखील आक्रमक असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षाने जागेवरील दावा कायम ठेवला. रात्री उशीरापर्यंत खलबते सुरू होते. पण तोडगा निघाला नाही. यावर आता खा. शरद पवार शनिवारी तोडगा काढण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने हट्ट न सोडल्यास मैत्रीपूर्ण लढत?

सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस व शिवसेनेत ताणाताणी झाली आहे. काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे, पण शिवसेनेने देखील ही जागा मिळावी, यासाठी प्रयत्न केले आहेत. उमेदवार देखील निश्चित केला आहे. त्यामुळे दोन दिवसात या जागेवर तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढत करावी का? यावर देखील चर्चा करण्यात येणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज