rajkiyalive

SANGLI LOKSABHA : जत तालुक्यातील तरूणांनी लिहिली रक्तांनी पत्रे

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : जत तालुक्यातील तरूणांनी लिहिली रक्तांनी पत्रे ; सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करताना महाविकास आघाडीने काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांना थांबू नये अपक्ष लढावे, अशी मागणी करत जत तालुक्यातील 20 तरूणांनी आपल्या रक्तानी लिहिलेली पत्रे विशाल पाटील यांना शनिवारी पाठिंबा दिला.

SANGLI LOKSABHA : जत तालुक्यातील तरूणांनी लिहिली रक्तांनी पत्रे

सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला न देता पक्षाची ताकद शून्य असलेल्या शिवेसना (उबाठा) गटाला सोडली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष व विश्वजीत कदम यांच्यावर अन्याय झाला आहे. विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत आता अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना आता सांगली लोकसभा मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येते. जत तालुक्यातील धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहीत विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे .

विशाल पाटलांनी काँग्रेसकडून अथवा अपक्ष निवडणूक लढवावी. धनगर समाज त्यांच्या पाठीशी असेल. असे रक्ताने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच काँग्रेस व विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला आहे. काँग्रेसचे विश्वजीत कदम व आ. विक्रम सावंत यांच्या मार्गदर्शनाली निवडणूक लढवावी, असे पत्रात नमूद केले आहे. विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्यानंतर त्यांना आता जिल्हाभरातून तरुण कार्यकर्त्यांमधून वाढता पाठिंबा
मिळत असल्याचे दिसून येते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज