rajkiyalive

SANGLI LOKSABHA : खासदार संजयकाकांच्याबद्दल कमालीची नाराजी : विशाल पाटील

SANGLI LOKSABHA : खासदार संजयकाकांच्याबद्दल कमालीची नाराजी : विशाल पाटील खानापूर तालुक्यात संपर्कदौरा ; विश्वजीत कदम यांचे नेतृत्व म्हणून लोकसभा निवडणूक लढणार

SANGLI LOKSABHA : खासदार संजयकाकांच्याबद्दल कमालीची नाराजी : विशाल पाटील

 

जनप्रवास/विटा 
         कोणत्याही पक्षामध्ये नेतृत्वावरून मतभेद होत असतात पण आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजीत कदम यांचे नेतृत्व काम मानून काम करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे येणारी लोकसभा निवडणुक विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखालीच लढवणार असल्याचे प्रतिपादन करून भाजपाचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे आम्हाला यावेळी यशाची निश्चित खात्री आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी केले.

  विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्याचा प्राथमिक दौरा सुरू केला आहे.

नागेवाडी, भाळवणी आणि लेंगरे जिल्हा परिषद गटाचा दौरा पूर्ण केल्यानंतर  पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी नगराध्यक्ष व विटा शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, शिवप्रताप पतसंस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे, बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत चव्हाण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष मनोज देवकर, काँग्रेसचे युवक नेते गजानन सुतार उपस्थित होते.

संजयकाका पाटील यांच्याबद्दल आणि भारतीय जनता पार्टी बद्दल सांगली जिल्हयामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

      यावेळी बोलताना विशाल पाटील पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्याबद्दल आणि भारतीय जनता पार्टी बद्दल सांगली जिल्हयामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. यावेळी आम्ही कसलीही कसर न ठेवता निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे .काँग्रेस नेते माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्याशी पूर्णपणे चर्चा झाली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली या लोकसभा निवडणुका लढवणार आहोत. काँग्रेस पक्षात आता कसल्याही पद्धतीचा विसंवाद नाही तसेच मित्रपक्षही आमच्या सोबत आहेत. प्रत्येकाला जागा मागण्याचा अधिकार आहे स्वाभिमानी  शेतकरी संघटना व बहुजन वंचित आघाडी हे दोन्ही पक्ष सध्या या जागेवर दावा करत असले तरी आमच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे चर्चेतून मार्ग निघू शकतो परंतु कसल्याही परिस्थितीत सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा असून काँग्रेसने तसे इंडिया आघाडीला कळवले आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण उमेदवारी करण्यास आग्रही आहोत.

आपली भूमिका मांडण्यासाठी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करणार आहोत.

    हा प्राथमिक दौरा आहे. यापुढे इंडिया आघाडीची एक व्यापक बैठक घेऊन सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन सविस्तरपणे आपली भूमिका मांडण्यासाठी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करणार आहोत. तत्पूर्वी खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही एक प्राथमिक दौरा आखला आहे. सध्याचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्याबद्दल कमालीची नाराजी आहे. भारतीय जनता पार्टीबद्दल लोकांमध्ये अनास्था आहे. मागील खेपेस तयारी करण्यासाठी आपणाला फार कमी अवधी मिळाला त्यातच बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार असल्याने मतांची विभागणी झाली आणि तेच भाजपच्या पथ्यावर पडले परंतु आता तसे होणार नाही. आता काँग्रेस पक्ष एकसंघपणे लढेल आणि सर्व मित्र पक्षांची साथ मिळेल राज्यात एक दोन जागा वगळता सर्व जागांचा तिढा सुटला आहे त्यामुळे कसल्याही परिस्थितीत सांगली लोकसभेवर या खेपेस काँग्रेस पक्ष विजय संपादन करेल.

     या निवडणुकीत आम्ही एकसंघपणे असून याउलट महायुतीतच कुरबुरी सुरू आहेत

ज्याअर्थी भारतीय जनता पार्टी आम्हाला ऑफर देते आहे त्याअर्थी त्यांच्या उमेदवाराबद्दल त्यांच्या खासदाराबद्दल त्यांना विश्वास वाटत नाही.त्यामुळे उमेदवारी बदलण्याच्या त्यांच्या हालचाली देखील सुरू आहेत परंतु आम्ही कसल्याही आमिषाला बळी न पडता काँग्रेस पक्षाच्या वतीने ही निवडणूक लढणार आहे स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांनी या परिसरात कार्यकर्त्यांचे जाळे विणले त्यांनी प्रचंड काम केले.  तसेच स्व.खासदार प्रकाशबापू पाटील, माजी मंत्री प्रतीकदादा पाटील यांनी देखील या परिसरात त्यांच्या त्यांच्या काळात मोठी कामे केले आहेत. सध्या आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून यावेळेस त्याचे रूपांतर विजयात करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास ही विशाल पाटील यांनी व्यक्त केला.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज