rajkiyalive

SANGLI LOKSABHA : लोकसभेसाठी जिल्ह्यात 24 लाख मतदार

SANGLI LOKSABHA : लोकसभेसाठी जिल्ह्यात 24 लाख मतदार . 71 हजार दुबार नावे वगळली, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

SANGLI LOKSABHA : लोकसभेसाठी जिल्ह्यात 24 लाख मतदार

जनप्रवास । प्रतिनिधी

सांगली ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाने अंतिम मतदार यादी मंगळवारी प्रसिध्द केली. या यादीनुसार जिल्ह्यात 24 लाख नऊ हजार 77 मतदार संख्या झाली आहे. 24 हजार 62 नवमतदारांचा समावेश असून मयतसह दुबार 71 हजार 486 मतदारांची नावे वगळण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

खानापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 3 लाख 32 हजार 53 मतदार आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी म्हणाले, लोकसभा निवडणूकीची प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. लोकसभा निवडणूकीसाठीची मतदारसंख्या मंगळवारी निश्चित झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंख्या जाहिर केली. 2024 च्या लोकसभा निवडणूकीसाठी 24 लाख नऊ हजार 77 हजार मतदारसंख्या निश्चित केली आहे. यामध्ये 12 लाख 30 हजार 326 आणि पुरुष 11 लाख 78 हजार 637 मतदारांचा समावेश आहे. तृतीय पंतीय 114 मतदार असून दुबार, मयत असे 71 हजार 486 मतदारांची नावे वगळली आहेत. जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील नवीन मतदारांची नोंदणी कमी होती. मतदार वाढवण्यासाठी निवडणूक विभागाने मोहीम राबवली. या मोहिमेला नव मतदारांनी चांगलीच साथ दिल्याने 24 हजार 62 मतदारांची नाव नोंदणी झाली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यात 18 लाख तीन हजार 54 मतदार होते.

माागील पाच वर्षात जिल्ह्यात सहा लाख सहा हजार 23 मतदारांची संख्या वाढली आहे. सांगली लोकसभा निवडणूकीसाठी मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. सांगली लोकसभेसाठी 18 लाख 44 हजार 456 मतदारसंख्या आहे. जत विधानसभा मतदारसंघात मतदारसंख्या घटली आहे. तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इस्लामपूर आणि शिराळा या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या दोन मतदारसंघात पाच लाख 64 हजार 621 मतदार आहेत.

 

जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 3 लाख 32 हजार 53 मतदार आहेत.

मिरज विधानसभा 3 लाख 19 हजार 999, सांगली तीन लाख 31 हजार 652, पलूस-कडेगाव 2 लाख 83 हजार 5, तासगाव-क.महांकाळ 2 लाख 98 हजार 220, जत 2 लाख 79 हजार 527, इस्लामपूर 2 लाख 69 हजार 111 आणि शिराळा 2 लाख 95 हजार 510 मतदारांचा समावेश आहे.

विधानसभा मतदारसंघ मतदार
मिरज 319999
सांगली 331652
पलूस-कडेगाव 283005
खानापूर 332053
तासगाव-क.महांकाळ 298220
जत 279527
इस्लामपूर 269111
शिराळा 295510
एकूण 24,09,077
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज