कवठेमहांकाळ (प्रतिनिधी) :-
SANGLI LOKSABHA : पैज लावणारे शिरढोण – बोरगावचे तरूण पोलिसांच्या ताब्यात : सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील व अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांच्या समर्थकानी आपला उमेदवार विजयी होईल यावर मोटरसायकलीची पैज लावणार्या तालुक्यातील दोघांवर कवठेमहांकाळ पोलीसानी कठोर कारवाई केली.
SANGLI LOKSABHA : पैज लावणारे शिरढोण – बोरगावचे तरूण पोलिसांच्या ताब्यात
पैज लावली —- व्हायरस झाली — पोलिसानी कारवाई केली —- पैज चांगलीच अंगलट आली, असा प्रकार कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण व बोरगांव येथे घडला. कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील याच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बोरगाव, शिरढोण येथील दोघांना ताब्यात घेवून दोघांनी पैजेत लावलेली सुमारे दोन लाख पंधरा हजार रूपये किंमतीच्या दोन मोटरसायकली जप्त केल्या.
ही कारवाई शुक्रवार दि.17 रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
रमेश संभाजी जाधव (वय 29) रा.बोरगाव आणि गौस मुबारक मुलाणी (वय 38 ) रा.शिरढोण याच्यावर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला.
या पैजेची तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरू होती
बोरगाव येथील रमेश संभाजी जाधव व शिरढोण येथील गौस मुबारक मुलाणी यांनी सांगली लोकसभा निवडणुकीचा निकालाबाबत भाजप पक्षाचा उमेदवार निवडुन येईल की अपक्ष उमेदवार निवडून येईल यासाठी स्वतःच्या फायद्याकरीता निवडणुकीतील उमेदवारावर बुलेट क्र. एम.एच. 10 /डी एफ.- 11 26 व युनिकॉर्न गाडी क्र. एम.एच.10 /डी.एच.- 8800 गाड्यावरती पैजा लावल्या होत्या. पैज लावून संदेश सोशल मिडीयाद्वारे प्रसारित केला होता. या पैजेची तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरू होती. पैजा लावल्याची माहिती पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांना समजताच त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
दोघांच्या दोन्ही दोन लाख पंधरा हजाराच्या मोटरसायकली जप्त केल्या.
पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास कारवाई करत रमेश संभाजी जाधव (वय 29), रा.बोरगाव व गौस मुबारक मुलाणी (वय 38), रा.शिरढोण यांना ताब्यात घेत दोघांच्या दोन्ही दोन लाख पंधरा हजाराच्या मोटरसायकली जप्त केल्या. दोघावर पोलिसात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला.पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील याच्या पोलीस पथकाने कारवाईचा बडगा उगारला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.