rajkiyalive

SANGLI LOKSABHA : माजी आमदार जगताप यांचा विशाल पाटील यांना पाठिंबा

भाजप सदस्यत्वाचा दिला राजीनामा ;भाजपला मोठा धक्का

SANGLI LOKSABHA : माजी आमदार जगताप यांचा विशाल पाटील यांना पाठिंबा जत : प्रतिनिधि : आगा0मी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची राजमाता जिजामाता सभागृह येथे बैठक बोलावली होती.या बैठकीत एकमुखी निर्णय घेत लोकसभेसाठी विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.सांगली लोकसभेसाठी सुरुवातीपासून खा.संजयकाकांना विरोध करणारे विलासराव जगताप यांनी आज थेट पक्षाचा राजीनामासुद्धा दिला.त्यांच्यासोबत इतर सर्व पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामे दिले.तालुक्यात जगताप यांचे मोठे व मजबूत नेटवर्क आहे.या निर्णयामुळे खा. संजयकाका आणि जिल्ह्यातील भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

SANGLI LOKSABHA : माजी आमदार जगताप यांचा विशाल पाटील यांना पाठिंबा

जगताप यांच्यासह तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत, युवा मोर्चाचे जिल्हा नेते संग्राम भैय्या जगताप, जत शहराध्यक्ष आण्णा भिसे, राजू डफळे, लक्ष्मण बोराडे, राजू चौगुले, आदींनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत. दरम्यान, विलासराव जगताप यांनी निर्णय जाहिर केल्यानंतर दुष्काळी फोरम दोन दिवसात विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय दिसेल असा ठाम दावा देखील केला आहे .विशाल पाटील मोठया मताधिक्याने विजयी होतील असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी खा. संजय काका पाटील यांची राजकारणातील गद्दारी जाहीरपणे समर्थक कार्यकर्त्यांसमोर मांडली. जगताप यांच्या निर्णया नंतर मात्र सांगली लोकसभेसाठी आता चांगलीच चूरस वाढली आहे.

खासदार संजय काका व विलासराव जगताप यांच्यातील मतभेद गेल्या काही वर्षापासून टोकावर गेले होते.

खासदार संजय काका यांनीच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत जगताप यांना अंतर्गत धक्का दिल्याचा आरोप जगताप गटाने त्यांच्यावर केला होता. त्यामुळे या दोघांमध्ये मतैक्य होण्याऐवजी ही दरी वाढतच गेली. त्याचे पडसाद आता लोकसभेच्या या निवडणुकीत दिसून येत आहेत.

सांगली लोकसभेसाठी संजय काका पाटील यांना भाजपने उमेदवारी देऊ नये अशी थेट मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली होती.

परंतु तरीही पक्षश्रेष्ठींनी तिसर्‍यांदा खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तेव्हापासून जगताप हे पक्षावर नाराज होते. त्यामुळे जगताप कोणती भूमिका घेणार याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर सोमवारी जत मध्ये स्वाभिमानी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जगताप यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. या बैठकीला तालुक्यातून जगताप गटाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळे आता संजय काकांना जत मधून मताधिक्य घेताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

साहेब बांधतील ते तोरण…

जत तालुक्यात विलासराव जगताप यांचा आजही स्वयंभू असा गट आहे. जिकडे साहेब तिकडे आम्ही असे म्हणणारे कट्टर जगताप समर्थकांनी साहेब घेतील ते धोरण.. बांधतील ते तोरण म्हणत.. पाठिंबा दिला. शिवाय ज्या साहेबांनी पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ फुलवले, त्याच साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍यांना जागा दाखवायची हीच वेळ असल्याचे कार्यकर्यांनी जाहिर केले. यावेळी अ‍ॅड.कुंडलिक पाटील,भीमराव शिंदे,आप्पासाहेब मासाळ,शिवानंद हाक्के,संतोष मोटे, गौतम ऐवळे,प्रकाश माने,कुमार कोळी,बाळ सावंत,कलापा पाचंगे,आनंदराव पाटील,आर.बी.पाटील, पालाक्ष लोणी,रमेश वाघमोडे, शेगाव उपसरपंच सचिन बोराडे ,आप्पा शिंदे, बिळुरचे उपसरपंच बसू जाबगोंड,सुनील पोतदार,शशिकांत पाटील,रेवन्ना माळी, देवराज चव्हाण,लक्ष्मण सिद्ररडी,प्रमोद चव्हाण, सुहास चव्हाण, प्रथमेश पाथरूठ,अयुब सय्यद, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपला जिल्ह्यात पहिला मोठा धक्का:

माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत वसंतदादा कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांना पाठिंबा दिला .माजी आमदार विलासराव जगताप यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला असून. आणखी बडे नेते भाजप सोडण्याच्या तयारी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

पक्षाने दखल घेतली नाही: माजीआमदार विधानसभा जगताप: राजीनामा पत्रात माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की मी आतापर्यंत पक्ष वाढण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलो. मात्र याउलट माझ्या विरोधात गट बांधण्याचेह काम सुरू करण्यात आले व माझे खच्चीकरण करण्यात आले. ते मला सहन झाले नाही .वरिष्ठांनी पण याची दखल घेतली नाही यासाठी मी भाजपच्या सदस्याचा राजीनामा देत आहे. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना दिलेल्या राजीनामा पत्रात माजी आमदार विलासराव जगताप म्हटले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज