rajkiyalive

SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांनी पळ काढू नये

SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांनी पळ काढू नये 

SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांनी पळ काढू नये  लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छक असलेले विशाल पाटील यांनी निवडणुकीसाठी सर्व्हे सुरू केला आहे. 40 जणांची टीम काम करत आहे. पण विशाल पाटील यांनी शेवटपर्यंत निवडणूक लढवावी, मैदानातून पळ काढू नये, असे आव्हान खा. संजयकाका पाटील यांनी दिले.

 

SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांनी पळ काढू नये 

जनप्रवास ।  सांगली :

सांगली महापालिकेतील विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी खा. संजयकाका पाटील महापालिकेत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खा. संजयकाका पाटील म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी अनेक जण मैदानात उतरत असतात. राष्ट्रवादीने देखील सांगली विधानसभेची जागा मागितली असल्याचे ऐकले. त्यांची देखील अपेक्षा असू शकते.

पण काळ आणि लोकच उमेदवार निवडून देत असतात.

काँग्रेसकडून शड्डू मारून उभे असलेले विशाल पाटील यांनी निवडणुकीपूर्वी सांगली लोकसभा मतदारसंघात सर्व्हे सुरू केला आहे. चाळीस लोकांची टीम मतदार संघात सर्व्हे करत आहे. पण त्यांनी शेवटपर्यंत निवडणूक लढवावी, मैदानातून पळ काढू नये. कवलापूर विमानतळ ‘कृषी उड्डाण-दोन’ मधून करण्यासाठी लवकरच सर्व्हे होईल, अशी ग्वाही देखील खा.पाटील यांनी दिली.

 

चिंतामणीनगर येथील उड्डाणपुलाला विलंब लागत आहे.

या परिसरातील नागरिकांनी अंतर्गत मार्ग व ड्रेनेजची मागणी केली होती. त्याचा आराखडा व निधीबाबत जरा विलंब झाला. पण आता काम सुरू आहे. रेल्वे विभागाच्या मुख्य अभियंत्यांशी चर्चा झाली आहे. मार्चअखेरीपर्यंत पूल उभा करण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे हे काम तीन महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच वसगडे येथील शेतकर्‍यांनी पाच तास रेल्वे रोखली होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासह इतर विषय मार्गी लागले असल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले.

कवलापूर येथील विमानतळाबाबत केंद्रीय पातळीवर चर्चा केली होती.

विमानतळासाठी 350 एकर जागा व फ्रिक्वेन्सीची आवश्यकता असते. कवलापुरची जागा 160 एकर आहे. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष, डाळींब आदी शेती पिकांची निर्यात करण्यासाठी कृषी उड्डाण-दोनमधून विमानतळ व्हावे, अशी मागणी केली आहे. अधिकार्‍यांशी सकारात्मक चर्चा देखील झाली. लवकरच सर्व्हे होणार असल्याचे खा. संजयकाका पाटील यांनी सांगितले. तर कृष्णा नदी शुध्दीकरणासाठी परिसरातील शेतकरी व साखर कारखानदारांनी भूमीका बदलावी, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

 

 

हेही वाचा

hatkanagle loksabha : शिंदे गटाला कमळाचाच पर्याय?

प्रतीक पाटील मैदानात की शेट्टींवर दबावतंत्र…?

काय खासदार संजयकाका पाटील म्हणाले.?

* चिंतामणीनगर रेल्वे पूल मार्चअखेरीपर्यंत पूर्ण होणार
* वसगडेतील शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी: रेल्वे विभाग राजी
* कवलापूर विमानतळासाठी लवकरच सर्व्हे
* कृष्णा नदीचे प्रदूषण रोखणे आवश्यक

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज