rajkiyalive

SANGLI MAHAPALIKA : सांगली महापालिकेत अधिकार्‍यांकडे आता मंत्रालयाप्रमाणे विभागाचे वाटप

जनप्रवास । सांगली

SANGLI MAHAPALIKA : सांगली महापालिकेत अधिकार्‍यांकडे आता मंत्रालयाप्रमाणे विभागाचे वाटप : महापालिकेचे अधिकारी कामात हगलर्जीपणा करतात, जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करतात, त्यामुळे आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रत्येक अधिकार्‍यांना जबाबदारी देत महापालिकेत ‘मिनी मंत्रालय’ स्थापन केले आहे. प्रत्येक अधिकार्‍यावर विविध विभागाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे अधिकार्‍यांना आता कामचुकारपणा करता येणार नाही. शिवाय प्रत्येक महिन्याला याचा आढावा देखील घेण्यात येणार आहे.

SANGLI MAHAPALIKA : सांगली महापालिकेत अधिकार्‍यांकडे आता मंत्रालयाप्रमाणे विभागाचे वाटप

महापालिकेत अनेक विभाग आहेत. पण विभागप्रमुख व प्रमुख अधिकारी जबाबदारी झटकत असल्याचे आयुक्तांना जाणवले. त्यामुळे कामात टाळाटाळपणा हा प्रकार जास्त आहे. यामुळे कामांना गती येत नाही. मनपाच्या इतिहासात प्रथमच विकास कामे, योजना यांना गती देण्यासाठी ‘मिनी मंत्रालय’ स्थापन केले आहे. अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे यांच्याकडे निवडणूक विषयक कामकाज, जनगणना विषयक कामकाज, नगरसचिव, सार्वजनिक बांधकाम, अभियांत्रिकी प्रकल्प, उद्यान व वृक्षसंगोपन, महिला व बालकल्याण या विभागातील कामावर नियंत्रण ठेवायचे आहे.

 अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे दिव्यांग विभाग

पाणीपुरवठा, जलनिःसारण, विद्युत विभाग, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापक कक्ष, जन्म-मृत्यू, विवाहनोंदणी या विभागाची जबाबदारी दिली आहे. उपायुक्त वैभव साबाळे यांच्याकडे कर्मचारी भरती, पदोन्नती कक्ष, मध्यवर्ती आस्थापना कक्ष, विभागीय चौकशी कक्ष, आवक-जावक कक्ष घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण विभाग, नगररचना विभाग, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम, फेरीवाला धोरण, परवाने विषयक कामकाज या विभागाची जबाबदारी दिली आहे.

उपायुक्त संजीव ओव्हाळ यांच्याकडे बांधकाम, विद्युत विभाग, उद्यान व वृक्ष, विधी विभाग

प्रभाग समिती 3 व 4, मालमत्ता व्यवस्थापन विभाग, उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडे मालमत्ता कर, एलबीटी, शिक्षण विभाग, सांस्कृतिक, वैद्यकीय आरोग्य विभाग, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, बांधकाम, विद्युत विभाग, पाणी पुरवठा या विभागाची जबाबदारी दिली आहे. अशोक माणकापुरे यांच्याकडे सहाय्यक आयुक्त, सामान्य प्रशासन, स्वागत आवक-जावक कक्ष अधिक्षक, भांडार कक्ष, मनपा निवडणूक जनगणना, समाजविकास विभाग समाज विकास अधिकारी या विभागाची जबाबदारी दिली आहे.

सचिन सागावकर यांच्याकडे मनपा बाजार, परवाना विभाग, सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी आहे.

नकुल जकाते यांच्याकडे सिस्टिम मॅनेजर या बरोबर प्रभारी सहाय्यक पदाची जबाबदारी दिली आहे. डॉ. रविंद्र ताटे यांच्याकडे प्रभारी पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य स्वच्छता अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. अमसिंह चव्हाण यांच्याकडे प्रभारी कार्यकारी विद्युत अभियंता पदाची जबाबदारी सोपवली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.अविनाश गोस्वामी, जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणारे धनंजय हर्षद यांच्याकडे विधी अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून सुनिल माळी यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज