अतिरिक्त आयुक्तांनी घेतला आढावा: मनपाची यंत्रणा करणार काम
sangli mahapalika news : पंतप्रधान आवास घरकुलांना बांधकाम परवान्यास विलंब: लाभार्थ्यांच्या तक्रारी : पंतप्रधान आवास योजनेतून घरकुले बांधण्यासाठी मनपाचा बांधकाम परवाना आवश्यक असतो. पण हा परवाना देण्यास मनाकडून विलंब होत आहे. शिवाय आराखडा, अंदाजपत्रक तयार करण्यासाठी खासगी वास्तुविशारद जादा पैशाची मागणी करत असल्याची तक्रार कुपवाडच्या लाभार्थ्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे केली. त्यांनी याबाबत मनपाची यंत्रणा उभी करू, अशी ग्वाही दिली.
sangli mahapalika news : पंतप्रधान आवास घरकुलांना बांधकाम परवान्यास विलंब: लाभार्थ्यांच्या तक्रारी
कुपवाड येथील प्रभाग क्रमांक तीनच्या कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांशी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी थेट संवाद साधला. आवास योजनेतील लाभार्थीनी बांधकाम परवाना मिळण्यासाठी लागणारा विलंबाबाबत व आराखडा, अंदाजपत्रक तयार करण्यासाठी खाजगी वास्तुविशारद यांचेकडुन अधिक शुल्क आकारले जात असल्याबाबत तक्रारी केल्या. यावर पर्यायी व्यवस्था निर्माण करुन आर्किटेकचे पॅनेल तयार करुन त्यांना माफक दरामध्ये अथवा त्यांचे शुल्क महानगरपालिकेमार्फत अदा करण्याची तरतुद करण्याचे धोरण राबविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळ यांनी सांगितले.
तसेच घरकुल पूर्ण होऊन आवास योजनेचे विहीत नमुन्यातील पेंटींग खर्च सीएसआर निधीतून करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,
आवश्यकता वाटल्यास मनपा निधीतून किमान खर्चात पेटींगचे काम करुन देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. शासन निर्णयानुसार आवास योजनेतील घरकुलासाठी शासनाकडुन प्रत्येकी 5 ब्रास इतकी वाळू महसुल विभागाकडून शासकीय शुल्कामध्ये उपलब्ध करुन देण्यात येते. यासाठी आवास याजनेतील लाभार्थीनी लेखी मागणी दिल्यास त्यानुसार रोडमॅप तयार करुन फक्त वाहतुकीच्या खर्चात घरकुलाच्या बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मिरज आणि कुपवाड येथे सहाय्यक आयुक्त यांचे नियंत्रणाखाली प्रधानमंत्री आवास योजनेचा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. लाभार्थीनी आवास 2.0 मध्ये नवीन अर्ज, कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि अनुदाना मिळण्यासाठी अडचणीकरीता प्रभागस्तरावरील कक्षातील सहाय्यक आयुक्तांशी संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी केले.
यावेळी सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, समाज विकास तज्ञ सागर शिंदे, इंजिनियर विहांग वाघमारे, शाखा अभियंता अशोक कुभांर, आझम जमादार, प्रसाद जामसांडेकर आदी अधिकारी उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



