rajkiyalive

sangli mahapalika news : सांगली मनपा क्षेत्रात 23 हजारापर्यंत भटकी कुत्री वर्षात चार हजार जणांना चावा

sangli mahapalika news : सांगली मनपा क्षेत्रात 23 हजारापर्यंत भटकी कुत्री वर्षात चार हजार जणांना चावा : महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे वाहनधारकांचे अपघात व बालकांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. मनपा क्षेत्रात आठ वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांची संख्या 14 हजाराच्या घरात होती आता ती 23 हजारापर्यंत पोहचली आहे. गेल्या वर्षभरात सुमारे 4 हजार 300 जणांवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. तर भटका कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी दररोज सरासरी चार-पाच प्रमाणे वर्षाला सुमारे दीड हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते, तरी कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यामुळे मनपा क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी आता दहशत निर्माण केली आहे.

sangli mahapalika news : सांगली मनपा क्षेत्रात 23 हजारापर्यंत भटकी कुत्री वर्षात चार हजार जणांना चावा

महापालिका क्षेत्रात भटकी कुत्री टोळीने फिरतात, त्यामुळे अनेक ठिकाणी दुचाकी वाहनांचे अपघात झाल्याचे दिसून येते. तर बालकांवर देखील हल्ले होत आहेत. मंगळवारी सांगली-मिरज रस्त्यावरील सिध्दीविनायक कॅन्सर हॉस्पिटलसमोर भटके कुत्रे अचानक आडवे आल्याने एका पोलीस कर्मचार्‍याला आपला जीव गमवावा लागला होता. तर सांगली येथील महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्रासमोरच एका बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे मनपा क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा अधोरेखीत झाली आहे. मनपा क्षेत्रात 2016 मध्ये साधारण 14 हजार भटक्या कुत्र्यांची संख्या असल्याचे पशुसंवर्धन व प्राणी मित्र संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले होते.

भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी प्रशासानाला विविध उपाययोजना करण्याच्या सूचना त्यावेळी नगरसेवकांनी केल्या होत्या.

मात्र तशा उपाययोजना झाल्या नाहीत. सन 2018 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर तत्कालिन स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील यांनी भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एजन्सी नेमण्यात आली. मात्र एजन्सीचे काम समाधानकारक न झाल्याने महापालिकेने एका पशुवैद्यकीय अधिकार्‍याची नेमणूक करून कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरू केले आहे.

निर्बीजीकरण करण्यापूर्वी कुत्र्यांना भुलीचे इंजेक्शन देणे आवश्यक असते.

इंजेक्शनचा साठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने निर्बीजीकरणाचा वेग देखील मंदावत आहे. दररोज साधारण चार ते पाच कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. कुत्र्यांची एकूण संख्या पाहता ते काम तितक्या प्रभावीपणे होत नाही. याचा त्रास आता नागरिकांना सहन करावा लागत आहे.

भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना त्रास होत आहे.

रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये कुत्र्यांची टोळकी तयार झाली आहेत. पहाटे कामावर जाणारे आणि रात्री उशिरा कामावरुन घरी परतणार्‍यांना या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांकडून खूप त्रास होतो. लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अंगावर धावून येणे, झुंडीने हल्ला करणे अशा घटना वाढल्या आहेत. अनेकांची अवस्था गंभीर झाली होती.

कुत्रे चावण्यामुळे रेबीज होण्याची भीती असते.

या भितीपोटी प्रत्येक जण अँटी रेबीजची लस घेण्यासाठी मनपाच्या आरोग्य केंद्रात धाव घेत आहेत. मनपा क्षेत्रात जानेवारी ते डिसेंबर 2024 या काळात सुमारे 4 हजार 300 जणांनी कुत्र्यांनी हल्ला केला आहे. त्यांना अँटी रेबीजची इजेक्शन मनपाच्यावतीने देण्यात आली आहेत.

भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मनपाची डॉग व्हॅन सांगली व मिरज शहरात आहे. पण डॉग व्हॅन दररोज फिरत नाही.

काही ठिकाणी डॉग व्हॅन गेल्यानंतर वासाने कुत्री अगोदरच पळून जात असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मनपा क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांची संख्या दररोज वाढत चालली आहे. यावर आता नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला ठोस पावले उचलावी लागणार आहेत.

सरासरी दररोज चार कुत्र्यांचे निर्बीजीकरण…
भटक्या कुत्र्यांची एक मादी चार पिलांना जन्म देते, त्यामुळे महापालिका क्षेत्रात कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाने घालून दिलेल्या निर्देशांनुसार महापालिका क्षेत्रात दररोज सरासरी चार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण महापालिकेकडून करून कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवली जात आहे. कुत्र्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांचे निर्बीजीकरण केले जाते. तरी देखील कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज