rajkiyalive

SANGLI : महापालिकेचा ई-बससेवेचा प्रस्ताव दहा दिवसात शासनाकडे

SANGLI : महापालिकेचा ई-बससेवेचा प्रस्ताव दहा दिवसात शासनाकडे : सांगली: केंद्र शासनाच्या सहाय्यभूत योजनेतंर्गत महापालिका क्षेत्रात ई-बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेला 50 इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

 

 

SANGLI : महापालिकेचा ई-बससेवेचा प्रस्ताव दहा दिवसात शासनाकडे

जनप्रवास । प्रतिनिधी

जागेची पाहणी पूर्ण: आराखडा तयार

सांगली: केंद्र शासनाच्या सहाय्यभूत योजनेतंर्गत महापालिका क्षेत्रात ई-बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेला 50 इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. महापालिका, बांधकाम विभाग, वीज महामंडळाच्या अधिकार्‍यांनी जागेची पाहणी केली असून या आठवड्यात अंतिम प्रस्ताव तयार होणार आहे. त्यानंतर दहा दिवसात हा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे जाणार आहे. त्यामुळे लवकरच महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात 50 ई-बस येणार आहे.

देशातील 44 शहरांची निवड झाली.

केंद्र सरकारकडून साहाय्यभूत योजनेअंतर्गत ‘इ-बस’ सेवा चालू करण्यासाठी देशातील 44 शहरांची निवड झाली. यात सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची निवड झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर महापालिकेची स्वत:ची परिवहन यंत्रणा आहे. पण सांगली महापालिकेची परिवहन यंत्रणा नाही. आता शासनाच्या या योजनेमुळे लवकरच सांगली महापालिका क्षेत्रात ‘इ-बस’ चालू होणार असून परिवहन विभाग नव्याने असणार आहे.

 

पहिल्या टप्प्यात महापालिकेला 50 बस मिळणार

ही सेवा चालू करण्यासाठी शासन महानगरपालिकेला 100 ‘ई-बस’ देणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेला 50 बस मिळणार आहे. त्यासाठी सांगली व मिरजेत आगार व चार्जिंग स्टेशन निश्चित करण्यात आली आहेत. लोकसंख्येच्या निकषात सांगली महापालिकेच्या मोठ्या बसना प्रतिकिलोमीटर अनुक्रमे 24 रुपये, मध्यम बसला 22 रुपये, तर ‘मिनी बस’साठी 20 रुपये प्रतिकिलोमीटर अनुदान मिळणार आहे. या गाड्या शासन 10 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देणार आहेत.

देखभाल दुरुस्तीसाठी देखील निम्मा खर्च केंद्र शासनाकडून

याशिवाय देखभाल दुरुस्तीसाठी देखील निम्मा खर्च केंद्र शासनाकडून पुरवला जाणार आहे. ई-बसेससाठी महापालिकेने तयारी दर्शविली होती. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी महापालिका क्षेत्रात चर्चासत्र पार पडले. यामध्ये अनेक मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. तर इतर महापालिकेच्या अधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी पुढचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार सांगली टिंबर एरिया येथील शाळा नंबर 22 मधील जागा व मिरजेतील अग्निशमनच्या जागेत बस डेपो व चार्जिंग स्टेशन करण्याचा निर्णय झाला.

 

टिंबर एरिया येथील शाळा नंबर 22 मध्ये बस डेपो व चार्जिंग स्टेशन

केंद्र शासनाकडून नियुक्त केलेल्या कन्व्हर्जन्स सर्व्हिसेस लिमिटेड, असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट समितीच्या अधिकार्‍यांनी महापालिकेच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर या योजनेला हिरवा कंदील दाखविला आहे. पहिल्या टप्यात 50 बसेस सुरू करण्याचा विचार आहे. त्यानुसार काम सुरू आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी टिंबर एरिया येथील शाळा नंबर 22 मध्ये बस डेपो व चार्जिंग स्टेशन विकसीत करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. बांधकाम विभागाच्या माध्यमातून बस डेपोचा आराखडा देखील तयार केला गेला आहे. या ठिकाणी विजेची आवश्यक आहे. त्यानुसार वीज महामंडळाच्या अधिकार्‍यांनी नुकतीच या जागेची पाहणी केली. त्यांनी देखील आवश्यक ती वीज पुरवठा करण्याची ग्वाही दिली आहे.

बांधकाम विभागाकडून प्रस्ताव अंतिम तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

हा आराखडा अंतिम होण्यास चार ते पाच दिवस लागतील, त्यानंतर आयुक्त, उपायुक्तांची अंतिम मान्यता घेऊन हा प्रस्ताव दहा दिवसात शासनाकडे जाणार आहे. शासनाने लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी या प्रस्तावाला मान्यता दिल्यास महापालिका क्षेत्रात मार्च-एप्रिलमध्ये या बसेस धाऊ शकतात. त्यासाठी आयुक्त सुनील पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही आवर्जुून वाचा

100 व्या नाट्यसंमेलनाची सांगलीत मुहुर्तमेढ

सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक

सांगलीत दररोज सात जणांना कुत्र्याचा चावा

ई-बस सेवेसाठी हे मार्ग प्रस्तावित…

ई बससेवेसचे 39 रूट प्रस्तावित केले आहेत. यात शहरासह ग्रामीण भागाचा समावेश आहे. अंकलखोप, डिग्रज, नवी धामणी, आरग, बेडग, नृसिंहवाडी, दानोळी, कोथळी, म्हैसाळ, बोलवाड, मालगाव, बुधगाव, काननवाडी या आसपासच्या 20ते 25 किलोमिटर गावासाठी बससेवा दिली जाणार आहे. मात्र अद्याप मार्ग निश्चित झालेले नाहीत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज