sangli mohim news : दुर्ग मोहिमेला जाताना आंबेनळी घाटात अपघात, जिल्ह्यातील शिवप्रतिष्ठानचे 15 कार्यकर्ते जखमी ” सांगली : दुर्ग मोहिमेस निघालेल्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकत्यांचे वाहन आंबेनळी घाटात पलटी होउन झालेल्या अपघातात अंकलखोप (ता. पलूस) येथील 15 कार्यकर्ते जखमी झाले असून यापैकी तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर वेगवेगळ्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
sangli mohim news : दुर्ग मोहिमेला जाताना आंबेनळी घाटात अपघात, जिल्ह्यातील शिवप्रतिष्ठानचे 15 कार्यकर्ते जखमी
शिवप्रतिष्ठानच्यावतीने उमरठ ते रायगड या दुर्ग मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील अनेक गावातून शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते उमरठ येथे रवाना झाले. अंकलखोप येथून 21 कार्यकर्ते पिकअप वाहनांने महाबळेश्वर मार्गे काल रात्री निघाले होते. यावेळी पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेनळी घाटातील कुंभळवणे गावच्या हद्दीत मध्यरात्री वाहन पलटी झाले.
वाहनातील 21 पैकी 15 जण जखमी झाले असून यापैकी सहा जणांना किरकोळ दुखापत झाली असल्याने उपचारासाठी महाडमधील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी झालेल्या विश्वंभर जोशी यांना निओ लाईफ हॉस्पिटल महाड येथे, सागर हलोळ्ळी यांना माणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात तर सत्यम पुजारी यांना रानडे हॉस्पिटल महाड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील अन्य जखमींची नावे अशी पवनकुमार जाधव, यश उपाध्ये, पवन साळुंखे, ओंकार खामकर, अविष्कार शिंदे, कुणाल चौगुले, रोहन नळवणकर, संकेत जाधव, अक्षय पाटील, गणेश गायकवाड अशी आहेत.
आ. डॉ.विश्वजित कदमांकडून तात्काळ विचारपूरस
या अपघाताची माहिती मिळताच आ. डॉ. विश्वजित कदम यांनी तात्काळ संपर्क साधून चौकशी केली. सर्व जखमींना तात्काळ सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये उपचाराची सज्जता करण्याची सूचना देण्यात आली. आज सायंकाळपर्यंत जखमींना खास रूग्णवाहिकेने सांगलीला हलविण्यात येणार असल्रूाची माहिती स्थानिक नातेवाईकाकडून मिळाली

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



