sangli news : मनपाचे जन्म व मृत्यूचे दाखले आता पोस्टाव्दारे घरपोच : महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूचे दाखल आता नागरिकांना पोस्टाव्दारे घरपोच करण्यासाठी महापालिकेने उपक्रम राबविला आहे. यामध्ये नागरिकांना नियमित व तत्काळ दाखले देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी केवळ ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. या उपक्रमाला महापालिकेने सुरूवात केली आहे.
sangli news : मनपाचे जन्म व मृत्यूचे दाखले आता पोस्टाव्दारे घरपोच
महापालिका क्षेत्रात जन्म व मृत्यू झालेल्या व्यक्तिंचे दाखले हे मनपाच्यावतीने दिले जाते. केवळ शासकीय रूग्णालयांतील दाखले त्याच ठिकाणी मिळतात. इतर सर्व रूग्णालयातील दाखले हे मनपाकडून दिले जातात. जन्म व मृत्यूचे दाखल आवश्यक असतात. त्यामुळे महापालिकेने शंभर दिवस कार्यक्रमातंर्गत जन्म-मृत्यूचे दाखले घरपोच देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
त्यासाठी पोस्ट खात्याची मदत घेण्यात आली आहे. पोस्टाच्या माध्यमातून हे दाखले दिले जाणार आहेत. ही प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. त्यासाठी नागरिकांना केवळ ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.
sangli-news-birth-and-death-certificates-of-the-municipal-corporation-will-now-be-delivered-to-your-home-by-post
नागरिकांना महापालिकेच्या संकेतस्थलावर जाऊन जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे अर्ज प्रक्रियेनंतर आवश्यक ते शुल्क भरावे लागणार आहे. साधा पोस्टसाठी पंधरा रूपये, रजिस्टर ए. डी. साठी चाळीस रूपये तर स्पीड पोस्टसाठी पन्नास रूपये भरावे लागणार आहेत.
प्रमाणपत्र तयार झाल्यावर ते भारतीय पोस्टद्वारे थेट नागरिकांच्या पत्त्यावर मिळणार आहे. त्यामुळे आता नागरिकांची होणारी गैरसोय बंद होणार आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



