rajkiyalive

sangli news : चिंतामणीनगर उड्डाणपुलाची डेडलाईन चुकणार: पुलाचे काम 25 कोटींचे सांगलीचे नुकसान 50 कोटींचे

जनप्रवास । प्रतिनिधी

sangli news : चिंतामणीनगर उड्डाणपुलाची डेडलाईन चुकणार: पुलाचे काम 25 कोटींचे सांगलीचे नुकसान 50 कोटींचे : चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याची अट आठ महिन्यांची असताना 14 महिने झाले तरी पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे सांगलीकरांचा वनवास कायम आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुलाच्या कामासाठी दि. 15 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. या मुदतीत देखील हे काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे सांगलीकरांचा वनवास आणखी वाढणार आहे. या पुलाचे काम 25 कोटींच्या घरात आहे. पण पूल वेळेत पूर्ण न झाल्याने सांगलीकरांचे 50 कोटींचे नुकसान झाले आहे.

sangli news : चिंतामणीनगर उड्डाणपुलाची डेडलाईन चुकणार: पुलाचे काम 25 कोटींचे सांगलीचे नुकसान 50 कोटींचे

मिरज-पुणे रेल्वे दुहेरीकरणांतर्गत या मार्गावरील अनेक पुलांचे रूंदीकरण करण्यात आले आहे. सांगली शहरातील सह्याद्रीनगर येथील पुलाच्या रूंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले होते. पुलाच्या या कामासाठी पूर्वी 16 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. बांधकामाच्या रचनेत केलेल्या बदलामुळे खर्च वाढला आहे.

दि. 10 जून 2023 ूला या कामाला प्रत्यक्षात सुरू करण्यात आली.

तर काम पूर्ण करण्याची मुदत दि. 10 जानेवारी 2014 पर्यंत देण्यात आली होती. तोपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची नोटीस रेल्वेने प्रसिद्ध केली होती. या मुदतीत हे काम पूर्ण करायचे होते. मात्र पूर्वीपासूनच या पुलाचे काम गतीने होताना दिसत नाही.

आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी गेल्या महिन्यातच जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली.

त्यामुळे सांगली-माधवनगर रस्त्यावर सतत प्रवास करणार्‍या तसेच या भागात राहणार्‍या लाखो सांगलीकरांचा वनवास सहन करावा लागत आहे. या पुलाचे काम पूर्ण व्हावे म्हणून भाजप, काँग्रेस, मनसे यासह सामाजिक संघटनांनी जोरदार आंदोलने केली. आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी गेल्या महिन्यातच जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुलाच्या कामासाठी दि. 15 ऑगस्टची मुदत दिली.या मुदतीत ठेकेदारास कोणत्याही परिस्थितीत काम करून पूल खुला करावाच लागेल. यापुढे मुदतवाढ न देण्याची भूमिका देखील त्यांनी सांगितले. पण आता 15 ऑगस्टला केवळ दहा दिवस बाकी आहेत. या दहा दिवसात पुलाचे काम होण्याची शक्यता कमीच आहे.

सांगली-माधवनगर रस्ता हा वाहतुकीचा आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.

शिवाय माधवनगर व सांगली ही दोन्ही शहरे वेगळी असली तरी अनेक आर्थिक व्यवहार हे सांगली व माधवनगरमधून होतात. सांगली महापालिका क्षेत्रात जकात असताना अनेकांनी माधवनगरमध्ये गोडाऊन घेतली. काहींनी व्यवसाय देखील माधवनगरमध्ये स्थलांरीत केला होता. त्यामुळे सांगली व माधवनगर ही शहरे व्यापारी केंद्रे आहेत.

या पुलाला पर्यायी म्हणून दिलेले कर्नाळ रस्ता, रजपूत गार्डन ते माधवनगर जकात नाका व दुसरा रस्ता म्हणजे कॉलेज कॉर्नर, शिंदे मळा, संजयनगर ते वसंतदादा साखर कारखाना हे दोन रस्ते आहेत. मात्र हे रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर नाहीत. त्यामुळे व्यापारी वर्गाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत आहे.

तर दुसरीकडे या रस्त्यावरील विद्यार्थी वाहतूक, ग्रामीण भागातून सांगलीत कामासाठी येणार्‍या व्यक्तिंची संख्या देखील मोठी आहे. त्यांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. या मार्गावरील खासगी वाहतुकीचे दर देखील वाढवले आहेत. शिवाय नागरिकांच्या दुचाकी-चारचाकीसाठी जादाचे पेट्रोल-डिझेल खर्च होऊ लागत असल्याने 50 कोटींचे नुकसान झाले आहे. ठेकेदाराने मात्र सतत मुदतवाढ घेतली आहे. नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. आता शेवटची मुदत दि. 15 ऑगस्टची होती. मात्र या मुदतीत पुलाचे काम पूर्ण होणार नाही. नागरिकांचा वनवास आणखी वाढणार आहे. त्यामुळे आता ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

जुना बुधगाव रस्त्याच्या पुलाचे काम थांबवले…

माधवनगर रोडवरील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मंदगतीने सुरू असतानाच आता महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत पंचशीलनगर रेल्वे उड्डाणपूल उभारणीची तयारी केली जात आहे. मात्र या कामाला राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी विरोध केला. चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्याला पर्यायी म्हणून जुना बुधगाव रस्त्याचा वापर केला जातो. त्यामुळे प्रथम चिंतामणीनगर येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे नंतर जुना बुधगाव रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू करावे, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे ठेकेदाराला तूर्त हे काम बंद ठेवले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज