rajkiyalive

sangli news : सांगलीत ठेकेदाराने लगाविली माहिती अधिकार कार्यकर्त्याला कानशीलात

sangli news : सांगलीत ठेकेदाराने लगाविली माहिती अधिकार कार्यकर्त्याला कानशीलात : महापालिकेच्या नालेसफाई कामाची माहिती मागविली म्हणून ठेकेदाराने एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला कानशिलात लगावली. शिवाय ठेकेदाराने माहिती अधिकार कार्यकर्त्यावर रिव्हॉल्व्हर रोखल्याची चर्चा देखील मनपात रंगली आहे. हा प्रकार मनपा मुख्यालयाच्या आवारात घडल्याने खळबळ उडाली आहे.

पावसाळ्यापूर्व मनपा क्षेत्रात नालेसफाईचे काम करण्यात येते. यासाठी दीड कोटींची निविदा मनपाने काढली आहे. सध्या या नालेसफाईचे काम सुरू आहे. या कामाची संपूर्ण माहिती सांगलीवाडी येथील एका माहिती अधिकार कायकर्त्याने अधिकार्‍याकडे मागितली होती. संबंधित अधिकार्‍याने हा प्रकार ठेकेदाराला सांगितला.

ठेकेदाराने महापालिका गाठली. सतत माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागवत असल्याने ठेकेदाराने माहिती अधिकार कार्यकर्त्याला जाब विचारला. दोघांमध्ये बाचाबाची झाली. यातून ठेकेदाराने माहिती अधिकार कार्यकर्त्याला दोन कानशिलात लगाविल्या. तर पुन्हा कामाची माहिती मागविल्यास सोडणार नाही, अशी धमकी देत ठेकेदाराने रिव्हॉल्व्हर रोखल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.

मनपा मुख्यालय आवारात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. मात्र या घटनेची पोलिसात नोंद झालेली नाही. महापालिकेत माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागविणार्‍या कार्यकर्त्याला मारण्याचा हा दुसरा प्रकार घडला आहे. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्त्याला ठेकेदाराने धमकी दिल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्या महासंघ मुंबईच्यावतीने निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी बुधवारी आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेऊन ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य संभाजी सावंत यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज