rajkiyalive

sangli news : महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर आता 4 मार्चला सुनावणी

sangli news : महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर आता 4 मार्चला सुनावणी :  महापालिका निवडणुकीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आता 4 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

sangli news : महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर आता 4 मार्चला सुनावणी

महापालिका निवडणुका रखडल्याने राज्यातील सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह तब्बल 23 महापालिकांवर प्रशासकीय राजवट आहे. प्रभाग रचना, लोकसंख्येत 10 टक्के वाढ धरून निश्चित केलेली सदस्यसंख्या आणि ओबीसी आरक्षण यावरून तब्बल 57 वेगवेगळ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहेत. त्यावर एकत्रित सुनावणी 22 जानेवारी रोजी होणार होती. मात्र, बुधवारी होणार्‍या सुनावण्यांच्या यादीत या याचिकांचा समावेश नव्हता. त्यानंतर 28 जानेवारी रोजी सुनावणी नाही. पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी म्हणजे आज होती. पण आजही सुनावणी झाली नाही. त्यामुळे या याचिकेवर आता 4 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

महाविकास आघाडीच्या राजवटीत मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली व त्यानुसार आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र, महायुतीचे सरकार आल्यानंतर पुन्हा 4 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली. ही प्रभाग रचना आता नव्याने करावी लागेल. 2017 च्या रचनेनुसार प्रभाग रचना कायम राहिली तरी पुणे महापालिकेत 2017 नंतर उरुळी देवाची व फुरसुंगी वगळून 32 गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे किमान पुणे महापालिकेत तरी नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे.प्रभाग रचना करणे, त्यावर हरकती-सूचनांची प्रक्रिया आणि अंतिम प्रभाग रचना यासाठी किमान 90 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात फेब्रुवारी अखेरपर्यंत निवडणुकांसंदर्भात निकाल न लागल्यास एप्रिल-मे महिन्यात निवडणुका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या निवडणुका थेट सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच घ्याव्या लागतील, अशी स्थिती आहे.

इच्छुकांच्या आशेवर पाणी

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणार्‍या सर्वपक्षीय इच्छुकांनी कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, बालाजी, शिर्डी, उज्जैन या ठिकाणी देवदर्शन सहली आयोजित केल्या होत्या. हळदी -कुंकूच्या निमित्ताने अनेक इच्छुकांनी कार्यक्रम आयोजित करून लाखो रुपयांचे वाण वाटले. आता महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या खर्चावर आणि निवडणुकीच्या आशेवर पाणी पडले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज