sangli news : सांगलीत उभारला जाणार शंभर फुटी ध्वज, राम मंदिर चौकात कामाला सुरूवात : येथील राम मंदिर चौकात शंभर फुटी भगवा ध्वज उभारण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. या बरोबर चौकाचे देखील सुशोभिकरण केले जाणार आहे. यासाठी भाजपच्या माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांच्या प्रयत्नातून वीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याची पाहणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली.
sangli news : सांगलीत उभारला जाणार शंभर फुटी ध्वज, राम मंदिर चौकात कामाला सुरूवात
सांगलीतील श्री राम मंदीर चौकाची एक वेगळी ओळख आहे. श्री राम मंदिर या चौकात काही महिन्यांपूर्वी हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी भाजपाच्या माजी नगरसेविका तथा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे यांनी या चौकामध्ये भव्य असा 100 फुटी भगवा ध्वज उभा करू, अशी घोषणा केली होती. यासाठी त्यांचा महापालिकेसह संबंधित यंत्रणा कडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. जवळपास 20 लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर झाला आहे. यामध्ये ध्वज आणि चौक सुशोभीकरण असा समावेश आहे.

दरम्यान अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा झाला.
त्यादिवशी या कामाचे सांगलीत भूमिपूजन करण्यात आले होते. आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार आणि जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यावेळी उपस्थित होते. दरम्यान शनिवारी या कामास प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली. माजी आमदार नितीन शिंदे यांनी कामाची पाहणी केली. काम दर्जेदार करण्याच्या सूचना मक्तेदारास दिल्या. यावेळी संजय जाधव, अनिरुद्ध कुंभार, राजू गस्ते, अर्जुन मजले, अमित शिंदे उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



