sangli news : पशुखाद्य निर्मिती कारखान्यात बेकायदेशीर युरियाचा वापर : पुणे, वाटेगाव येथील दोघांवर गुन्हा दाखल.: सांगली : वसंतदादा कारखाना परिसरात सुरू असलेल्या पशुखाद्य निर्मिती कारखान्यात शेतीसाठी वापरण्यास परवानगी असलेला युरिया बेकायदेशीरपणे वापरला जात असल्याबद्दल कृषी विभागाने छापा मारला. याबाबत बुटाला न्युट्रिव्हेट प्रा. लि. चे मालक वसंत बुटाला (वय 52, रा. पुणे) व डीडी केमिकल्स न्ड फर्टिलायझर्सचे मालक प्रकाश रामचंद्र दुकाने (वय 50, रा. वाटेगाव, ता. वाळवा) या दोघांविरूद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत दोन लाखाचा युरिया जप्त केला. विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
sangli news : पशुखाद्य निर्मिती कारखान्यात बेकायदेशीर युरियाचा वापर : पुणे, वाटेगाव येथील दोघांवर गुन्हा दाखल.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुटाला न्युट्रिव्हेट प्रा. लि. या नावाने वसंतदादा कारखाना परिसरात भाड्याने जागा घेऊन पशुखाद्य निर्मिती कारखाना सुरू करण्यात आला होता. कृषी विभागाच्या अधिकार्यांनी या कारखान्यात दि. 21 मे रोजी जाऊन पाहणी केली. तेव्हा शेतीसाठीचा युरिया पशुखाद्य निर्मितीत वापरला जात असल्याचे निदर्शनास आले. पशुखाद्य निर्मितीत बीआयएस नुसार ठराविक प्रमाणात युरिया वापरण्यास परवानगी आहे.
परंतू हा युरिया केवळ औद्योगिक कारणासाठी निर्माण केलेला असणे बंधनकारक आहे. कृषी विभागाने केलेल्या पाहणीत औद्योगिक वापरासाठी असलेल्या युरियाच्या 50 किलोच्या बनावट पॅकिंगमध्ये शेतीसाठीचा युरिया 113 बॅगमध्ये भरल्याचे आढळून आले. या युरियाचे बिल तपासल्यानंतर दि. 5 मे रोजी डीडी केमिकल्स न्ड फर्टिलायझर्स वाटेगाव येथील असल्याचे स्पष्ट झाले. बिलातील युरियाबाबत संशय आल्यामुळे कसून चौकशी केली.
sangli-news-illegal-use-of-urea-in-animal-feed-manufacturing-factory-case-registered-against-two-from-pune-wategaon
तेव्हा मूळ शेती वापरासाठी हा युरिया असताना तो औद्योगिक वापराच्या बनावट बॅगमध्ये भरून पुरवठा केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन लाख रूपयांचा हा युरिया साठा जप्त केला. याप्रकरणी निरीक्षक पाटील यांनी सोमवारी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वसंत बुटाला आणि प्रकाश दुकाने या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.