rajkiyalive

sangli news : सांगली जिल्हा परिषदेत शिपायाने बोगस प्रमाणपत्राने घेतली पदोन्नती

जिल्हा परिषद सीईओंनी बजावली नोटीस

sangli news : सांगली जिल्हा परिषदेत शिपायाने बोगस प्रमाणपत्राने घेतली पदोन्नती : तासगावमधील शिपायाने राजस्थानमधील विद्यापीठाचे बोगस प्रमाणपत्र जोडून पदोन्नती मिळविल्याचे उघडकीस आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी त्याला खुलासा सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे.

sangli news : सांगली जिल्हा परिषदेत शिपायाने बोगस प्रमाणपत्राने घेतली पदोन्नती

तासगाव पंचायत समितीअंतर्गत हातनूर पशुवैद्यकीय रुग्णालयात शिपाई प्रशांत रामचंद्र कुंभार असे कर्मचार्‍याचे नाव आहे. त्याने पदोन्नतीने बांधकाम उपविभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नियुक्ती मिळविली आहे. त्यासाठी बनावट शैक्षणिक कागदपत्रे सादर करुन शासनाची फसवणूक ठेवल्याचा ठपका जिल्हा परिषदेने ठेवला आहे. 15 ऑक्टोबररोजी त्यांना या पदावर पदोन्नती व पदस्थापना देण्यात आली. या पदोन्नतीसाठी त्यांनी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (स्थापत्य अभियांत्रिकी) या पदवीचे प्रमाणपत्र जोडले होते.

जिल्हा परिषद प्रशासनाने हे प्रमाणपत्र फेरतपासणीसाठी संबंधित विद्यापीठाकडे 28 नोव्हेंबर रोजी पाठविले, त्यावेळी ही पदवी बनावट असल्याचे विद्यापीठाने जिल्हा परिषदेला कळविले. त्यामुळे बनावट पदवी सादर करुन शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका प्रशासनाने कुंभार यांच्यावर ठेवला आहे.

खोटा दस्ताऐवज सादर करुन कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याचाही आरोप आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने बजावलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, जिल्हा परिषद शिस्त सेवा नियमांच्या तरतुदीनुसार तुमच्यावर कारवाई का करु नये? याचा खुलासा सादर करावा. अन्यथा कारवाई केली जाईल.

दोषी आढळल्यास बडतर्र्फीची कारवाई

बांधकाम विभागातील कर्मचारी प्रशांत कुंभार यांनी बनावट पदवी प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. तो सादर करण्यास त्यांनी मुदत मागितली आहे. चौकशीअंती ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर प्रसंगी बडतर्फीचीही कारवाई होऊ शकते, असे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज