इंद्रप्रस्थ पतसंस्था 251 कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट पुर्ण करेल ः दिलीपतात्या पाटील : इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेने 100 कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण केला असून आगामी आर्थिक वर्षात 251 कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट पुर्ण करेल. असा विश्वास संस्थेचे संस्थापक, सांगली जिल्हा बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक दिलीपराव पाटील यांनी व्यक्त केला.
इंद्रप्रस्थ पतसंस्था 251 कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट पुर्ण करेल ः दिलीपतात्या पाटील
इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेचा 31 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील म्हणाले, इंद्रप्रस्थ संस्थेची स्थापना 14 जानेवारी 1994 रोजी झाली असून जिल्ह्यात संस्थेच्या 8 शाखा कार्यरत आहेत. कार्यक्रमास राजारामबापू दूध संघाचे चेअरमन नेताजी पाटील, उद्योजक भावेश शहा, उद्योजक सतीश पाटील, अंबिका पतसंस्थेच्या चेअरमन उषा पंडित, माजी पं.स.सदस्य जयकर पाटील, रोजा किणीकर, भास्कर पाटील यांची भाषणे झाली.
माजी उपसभापती नेताजी पाटील, दुध संघाचे संचालक प्रशांत थोरात, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक सुजित मोरे, राजारामबापू दूध संघाचे संचालक धैर्यशील पाटील, चंद्रकांत पाटील, प्रियांका कनप-पाटील, जगन्नाथ पाटील, संस्थेचे माजी चेअरमन युवराज सूर्यवंशी, मोहनराव शिंदे, डॉ.प्रवीण पोरवाल, अमोल गुरव, क्रांतीप्रसाद पाटील, दादासो शेळके, सुहास घोरपडे, बी.आर. पाटील, हौसेराव भोसले, सुहास हांडे यांच्यासह सर्व शाखांचे शाखा सल्लागार, संस्थेचे सभासद, ठेवीदार व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. संस्थेचे व्हा.चेअरमन अधिक चव्हाण यांनी आभार मानले

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.