पक्षविरहित एकजुटीची गरज ः खा. विशाल पाटील
sangli news : सांगलीची अवस्था बीड जिल्ह्यासारखी नको : जिल्ह्यात महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिस बळ अपुरे असल्याचे धोकादायक आहे. त्याचा गांभिर्याने विचार करावा लागेल. सांगली जिल्ह्याची परिस्थिती बीड व्हायचा नसेल तर गंभीर पाऊले उचलावी लागतील. त्यासाठी पक्षविरहीत एकजूट दाखवावी लागेल, अशी भूमिका खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली.
sangli news : सांगलीची अवस्था बीड जिल्ह्यासारखी नको
जत तालुक्यातील एका चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. पत्नी पुजा यांच्यासह खासदार विशाल यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली. त्याचं सात्वन करणे कठीण होतं, अशी कबुली त्यांनी दिली. खासदार पाटील म्हणाले, मी त्यांची माफी मागितली, कारण आम्ही सारेजण त्यांच्या लेकीची सुरक्षा करण्यात कमी पडलो. पोक्सो गुन्ह्यातील एक गुन्हेगारा मोकाट गावात फिरतोय, याची माहिती गावाला कळायला पाहिजे. जिल्हाभर आता हे व्हायला हवं, त्यांची यादी ग्रामपंचायतीच्या फलकावर प्रसिद्ध करायला हवी. लोक घाबरले आहेत. मुलींनी शाळेत पाठवावे की नको, असा विचार करताहेत.
दोन दिवस कँडल मार्च काढून काही होणार नाही. गरिबा घरच्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे,
तो तेवढ्याच गांभिर्याने हाताळण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याशी मी चर्चा करणार आहे. प्रबोधन, प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावे लागतील. जतसारख्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बळ द्यावे लागेल. राजकारण बाजूला ठेवून एक व्यापक बैठक घ्यावी, असे आवाहन मी पालकमंत्र्यांना करणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.
शाळेबाहेर रोडरोमिओ मोकाट फिरतात. शिट्या वाजवतात, हे गंभीर आहे.
मोठ्या गुन्ह्याची सुरवात तेथून होते. राज्याच्या अर्थसंकल्पात महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त गुंतवणूक करून पोलिस, पोलिसमित्र, माजी सैनिक यांना याकामी बळ दिले पाहिजे. नशाखोरीला रोखतानाच याबाबत आक्रमक व्हावे लागेल. मोठी महाविद्यालये, शाळांच्या परिसरात शाळा भरताना, सुटताना सुरक्षा द्यायला हवी. निर्भया पथकांची संख्या वाढवायला हवी. या प्रवृत्तीला कुठेतरी संघटित गुन्हेगारीतून खतपाणी मिळते आहे. संघटित गुन्हेगारीचा बिमोड तितकाच महत्वाचा आहे.
महापालिकेतील भ्रष्टाचार मोडून काढू
महानगरपालिकेचे आयुक्त थेट आयएएस दर्जाचे आहेत. खालच्या पातळीवरील भ्रष्टाचार कमी झाला असून वरच्या पातळीवर सुरु असल्याच्या तक्रारी येत आहेत. खालीपासून वरिष्ट पातळीपर्यंत भ्रष्टाचार सहन केला जाणार नसून तो मोडून काढला जाईल, असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी दिला. कुठल्याही परिस्थितीत वाढीव घरपट्टी नको, याबाबत आयुक्तांनी शब्द दिला आहे. मात्र सर्वेक्षणाबाबत नागरिकांनी अडवणूक करु नये, असे आवाहनही त्यांनी केले

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



