rajkiyalive

sangli news : शक्तिपीठ’ भूसंपादनाचा प्रातांधिकार्‍यांकडून डाटा तयार: दोन दिवसात ‘एसएसआरडीसी’कडे

15 दिवसात भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरूवात होणार

sangli news : शक्तिपीठ’ भूसंपादनाचा प्रातांधिकार्‍यांकडून डाटा तयार: दोन दिवसात ‘एसएसआरडीसी’कडे : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी जिल्ह्यातील सुमारे दीड हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या भूसंपादनाचा डाटा प्रातांधिकार्‍यांमार्फत तयार करण्यात आला आहे. तो डाटा दोन दिवसात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सादर केला जाणार आहे. त्यानुसार पंधरा दिवसात भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. यापूर्वी माकिर्ंंग केलेल्या शेतकर्‍यांना दिलेल्या नोटीसीनुसार कार्यवाही सुरू होणार की नव्याने नोटीस काढल्या जाणार? याकडे लक्ष लागले आहे.

sangli news : शक्तिपीठ’ भूसंपादनाचा प्रातांधिकार्‍यांकडून डाटा तयार: दोन दिवसात ‘एसएसआरडीसी’कडे

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून 802 किमी लांबीचा हा महामार्ग असून सुमारे 27 हजार हेक्टर जमिन अधिग्रहित करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकार 86 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. सहा पदरी असणारा हा महामार्ग राज्यातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. या महामार्गाला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी विरोध केला होता. त्यामुळे महामार्गाला स्थगिती होती. मात्र पुन्हा याचे काम सुरू झाले आहे. मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा वगळता इतर 11 जिल्ह्यातील भूसंपादन अधिकार्‍यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे चर्चा केली.

या महामार्गाला गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

त्यानुसार सांगली जिल्ह्यात भूसंपादन अधिकार्‍यांनी या महामार्ग प्रकल्पाची फाईली पुन्हा ओपन केली आहे. या महामार्गासाठी जिल्ह्यातील पाच हजार एकर जमीन जाणार आहे. विरोध होत असलेल्या गावांची माहिती घेतली जात आहे. याअगोदर झालेल्या रस्त्यांना शासनाने चौपट भरपाई दिलेली होती.

शक्तिपीठमुळे द्राक्षे, ऊस शेतजमिनीचे बाजारभाव एकरी पन्नास लाख ते एक कोटीच्या आसपास आहेत.

मात्र रेडिरेकनरचा दर केवळ 10 ते 13 लाख रुपये आहे. या महामार्गासाठी जमीन गेल्यास भरपाई तुटपुंजी मिळणार असल्याने अनेक शेतकर्‍यांचा महामार्गास विरोध आहे. चालू बाजारभाव गृहित धरून त्याच्या चारपट भरपाई मिळायला हवी, अशी दुष्काळी टापूतील शेतकर्‍यांच्या भावना आहेत.

तर दुसरीकडे हा महामार्ग पद्माळे व सांगलीवाडी येथून जाणार आहे. त्यामुळे सांगलीला पुराचा मोठा धोका निर्माण होणार असल्याने सांगलीवाडीसह इतर शेतकर्‍यांचा याला विरोध आहे. त्यामुळे अधिकार्‍यांकडून याची चाचपणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात भूसंपादन करण्यासाठी प्रातांधिकार्‍यांकडून डाटा तयार करण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते.

त्यानुसार हा डाटा सोमवारी किंवा मंगळवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसात भूसंपादाची कार्यवाही सुरू होणार आहे. भूसंपादनासाठी आहे त्या नोटीसा कायम ठेवायच्या की नवीन नोटीसा काढायच्या याबाबतच्या सूचना अद्याप वरिष्ठ अधिकार्‍यांकडून आल्या नाहीत.

असा आहे जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग…

सोलापूर जिल्ह्यातून खानापूर (जि. सांगली) तालुक्यातील बाणूरगडमध्ये महामार्गाचा प्रवेश होईल. तेथून कवठेमहांकाळ तालुक्यात तिसंगी, तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकीतून, मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी अशा गावांमधून तो जाणार आहे. चार महिन्यांपूर्वी या ठिकाणी रेखांकन (मार्किंग) केले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज