sangli news : अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार : बेळगाव : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात निर्माण होणार्या पूर स्थितीला कर्नाटकातील अलमट्टी धरणाला जबाबदार मानण्यात येत. सध्या या धरणाची उंची 519 मीटर इतकी आहे. मात्र आता ही उंची आणखी पाच मीटरने वाढवून 524 मीटर करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय . त्यासाठी केंद्र सरकाराने परवानगी द्यावी अशी मागणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकाकडे केलीय. ही परवानगी मिळाल्यास सांगली आणि कोल्हापूरला पावसाळी पुराचा धोका आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे . त्यामुळं केंद्र सरकार याबाबत काय निर्णय देतं याकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे .
sangli news : अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
कर्नाटककडून अलमट्टी धरणातून पाणी न सोडण्यात आल्याने कृष्णेच्या पाण्याचा फुगवटा वाढत जाऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याचा दावा महाराष्ट्राकडून करण्यात आला. मात्र आता कर्नाटक सरकारने ते या धरणाच्या भिंतीची उंची 519 मीटरवरून आणखी पाच मीटरने वाढवून 524 मीटर करणार असल्याचं जाहीर केलय . सध्या बेळगावमध्ये सुरु असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यासाठी बैठक आयोजित केली होती .
या बैठकीत सत्ताधारी काँग्रेसने केलेल्या धरणाची उंची वाढवण्याच्या मागणीला विरोधी पक्ष असलेल्या भाजपने देखील पाठिंबा दिलाय. ज्यामुळं महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमा वादाबरोबरच कृष्णेच्या पाण्याचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
* 2005 साली जेव्हा अलमट्टी धारणाच काम पूर्ण झालं तेव्हा या धरणाच्या भिंतीची उंची 512 मीटर होती .
* याच वर्षी कृष्णेला आलेल्या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्हात हाहाकार उडाला .
* मात्र त्याला न जुमानता कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची आणखी वाढवून 2019 टी एम सी पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आणि 2014 मध्ये धरणाच्या भीतीची उंची 519 टी एम सी करण्यात आली .
* सध्या अलमट्टी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 123 टी एम सी इतकी असून त्यामुळे उत्तर कर्नाटकातील एक लाख एकर शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आलंय .
अलमट्टी धरणाची उंची वाढवून कर्नाटकला आणखी मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखालची आणायचीय. त्यासाठी नेमलेल्या केंद्रीय लवादाने कर्नाटकला ही उंची 524 मीटर करायला परवानगी देखील दिलीय . यानंतर केंद्र सरकाने याबद्दलचा आदेश काढल्यावर कर्नाटक सरकारला उंची वाढवता येणार आहे . खरं तर कर्नाटक सरकारने अवैधरित्या या धरणाची उंची 524 मीटर इतकी वाढवलेलीच आहे . फक्त केंद्र सरकारने आदेश काढेपर्यंत धरणाचे दरवाजे 519 मीटर उंचीपर्यंत बांधण्यात आल्याचा दावा कर्नाटक सरकाकडून करण्यात येतोय . मात्र यामुळं सांगली आणि कोल्हापूरला पुराचा धोका कित्येक पटींनी वाढणार आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



