rajkiyalive

sangli news : सांगली महापालिकेची जानेवारीत प्रभाग रचना लवकरच आदेश येणार: चार सदस्यांचा एक प्रभाग

sangli news : सांगली महापालिकेची जानेवारीत प्रभाग रचना लवकरच आदेश येणार: चार सदस्यांचा एक प्रभाग : महापालिकेच्या निवडणुकीचा लवकरच बिगुल वाजणार असून जानेवारी महिन्यात प्रभाग रचनेला प्रारंभ होणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडून लवकरच आदेश प्राप्त होतील, अशी शक्यता अधिकार्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. तत्पूर्वी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग करण्यावर अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे आता महिनाभरात महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरूवात होणार आहे.

sangli news : सांगली महापालिकेची जानेवारीत प्रभाग रचना लवकरच आदेश येणार: चार सदस्यांचा एक प्रभाग

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. ओबीसी आरक्षण व वाढीवर प्रभाग रचनेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत ऑगस्ट 2023 ला संपली आहे. त्यानंतर प्रशासक म्हणून आयुक्तांकडे कारभार आहे. गेल्या 16 महिन्यांपासून महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त काम पाहत आहेत.

राज्यात नुकत्याच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने करण्याचा त्यांचा हट्ट सुरू आहे. ओबीसी आरक्षणा व प्रभाग रचनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावर जानेवारीत सुनावणी होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सुनावणी निकालात काढण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना केल्या आहेत. तर तत्कालिन राज्य शासनाने मुंबई महापालिका वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला मंत्रीमंडळाने मान्यता देखील दिली आहे. आता नव्याने होणार्‍या सरकारमध्ये पुन्हा याला अंतिम मान्यता देऊन राज्य निवडणूक आयोगाकडे हा अहवाल जाणार आहे. तोपर्यंत न्यायालयीन प्रकिया देखील शासन पूर्ण करणार आहे.

त्यानंतर निवडणूक आयोगाकडून ज्या महापालिकांची अद्याप प्रभाग रचना झालेली नाही. त्या ठिकाणी प्रभाग रचना करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करणार आहे. या प्रक्रियेला किमान महिना लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारीत प्रभाग रचनेला प्रारंभ होऊ शकताो, अशी शक्यता अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

महापालिकेच्या सभागृहात 2018 साली 78 नगरसेवक होते. यासाठी वीस प्रभाग केले आहेत. 18 प्रभाग हे चार सदस्यांचे आहेत. तर दोन प्रभाग तीन सदस्यांचे आहेत. मात्र तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसंख्येनुसार नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याला न्यायालयाची मान्यता मिळाली तर 85 नगरसेवक नव्या सभागृहात असतील. महापालिकेची लोकसंख्या 6 लाखांच्या घरात आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या किमान 65 तर कमाल 85 ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मनपाची नगरसेवक संख्या 85 वर जाणार असून महापालिका क्षेत्रात चार सदस्यांचे 19 प्रभाग होणार आहेत. तर 3 सदस्यांचे तीन प्रभाग होण्याची शक्यता आहे.

तर प्रभाग व सदस्य संख्या वाढणार….

तत्कालिन राज्य शासनाने लोकसंख्येच्या आधार प्रभाग व सदस्य संख्या वाढवली आहे. 2021 ला जनगणना झाली नाही मग कोणत्या लोकसंख्येच्या आधारे सदस्यसंख्या वाढली? यावर न्यायालयात दावा दाखल झाला आहे. न्यायालयाने शासनाच्या बाजुने निकाल दिला तर मनपा क्षेत्रात सदस्यसंख्या ही 78 वरून 85 होणार आहे. तर प्रभाग देखील वाढणार आहेत. त्यामुळे जानेवारीच्या होणार्‍या सुनावणीत याचा निकाल लागेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज