SANGLI : निवडणुकीच्या तोंडावर आमदारांच्या 125 कोटींच्या कामांना ब्रेक
लोकसभा आचारसंहितेचा फटका, सिमेंट रस्ते, रस्ते दुरुस्ती, पाणंद, समाजभवनसह विविध कामे ठप्प
जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI : निवडणुकीच्या तोंडावर आमदारांच्या 125 कोटींच्या कामांना ब्रेक : सांगली ः लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी स्वतःचे वजन वापरुन निधी मिळविला. जिल्हा परिषदेचे सभागृह नसल्याने जिल्हा नियोजन समितीकडून कामांना मंजुरी घेतली. सिमेंट रस्ते, रस्ते दुरुस्ती, पाणंद रस्ते, गटार लाईन, समाज भवनसह अन्य सुमारे 125 कोटींचा निधी मंजूर करून घेतला. यात प्रामुख्याने जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत स्तरावरील कामांचा समावेश आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आमदारांनी सुचविलेल्या कामांनाही ब्रेक लागला आहे.
जिल्ह्याच्या विकासात नियोजन समितीचे योगदान महत्वाचे असते. पालकमंत्री समिती अध्यक्ष असून नियोजन समितीवर जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिकांतून सदस्य निवडून दिले जातात. आमदार खासदार निमंत्रित सदस्य असतात. तसेच पालकमंत्री नियुक्त केलेले काही सदस्य आहेत. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांवर प्रशासक असल्याने सध्या नियोजन समितीवर आमदारांचे वर्चस्व आहे. वार्षिक योजनांचा निधी खासदार आणि आमदारांनी अधिकाधिक मिळविला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
SANGLI : निवडणुकीच्या तोंडावर आमदारांच्या 125 कोटींच्या कामांना ब्रेक : मागील दीड महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.
जिल्ह्यात लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान पार पडले आहे. मतदान प्रक्रिया पार पडली असली अद्याप आचारसंहिता शिथिल झालेली नाही. निवडणुकीच्या मतदानानंतर आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता आहे, परंतु पुढील तीन महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे, या परिस्थितीत जूनपासून पावसाला सुरुवात होणार आहे, या पार्श्वभूमीवर मंजूर झालेला निधी मतदारसंघात खर्च करण्यासाठी आमदारांनी चंग बांधला असताना आचारसंहितेचा फटका बसला आहे.
ग्रामीण रस्त्यांसाठी 32 कोटी निधी देण्यात आला आहे. पालकमंत्री, खासदार, आमदारांना निधी देण्यात आला.
त्यामुळे ग्रामीण रस्त्यांच्या कामांतही खासदार आणि आमदारांचाच बोलबाला असल्याचे दिसून येते. जनसुविधा व नागरी सुविधांचा 48 कोटींचा निधी मंजूर आहे. यात जनसुविधांचा 20 कोटी, तर नागरी सुविधांच्या 28 कोटींच्या कामांचा समावेश आहे. या निधीतून आमदारांनी सूचविलेल्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात ग्रामपंचायतस्तरावरील समाजभवन, सिमेंट रस्ते, स्मशान भूमी, गटार लाइन, पावसाळी नाल्या आदींचा समावेश आहे. परंतु, आचारसंहितेमुळे या कामांना मंजुरी, निविदा प्रक्रिया राबविता येत नसल्याने हा निधी पडून आहे.
जिल्ह्यात पाणंद रस्ते योजना राबवली जात आहे. यासाठी 26 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.
यातील दोन ते तीन कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. उर्वरित 23 कोटींचा निधी शिल्लक आहे. मात्र, आचारसंहितेमुळे पाणंद रस्त्यांची कामे थांबली आहेत. पावसाळ्यापूर्वी या कामांना सुरुवात न झाल्यास ही कामे दिवाळीनंतरच करता येतील. यामुळे हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जुळवलेले गणित बिघडण्याची चिंता काही आमदारांना लागली आहे. मतमोजणीनंतर आचारसंहिता संपणार आहे. परंतु, त्यानंतर पावसाळ्याला सुरुवात झाल्यास निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे.
SANGLI : निवडणुकीच्या तोंडावर आमदारांच्या 125 कोटींच्या कामांना ब्रेक :आचारसंहिता शिथिल करा – आ. विक्रमसिंह सावंत
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती, गटार लाइन, विजेचे पोल उभारण्याची अत्यावश्यक कामे केली जातात. परंतु, या कामांनाही आचारसंहितेचा फटका बसला आहे. ही कामे पूर्ण न आल्यास ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. 4 जूनला मतमोजणी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक कामांसाठी आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



