2 लाख 20 हजारांचे दागिने केले लंपास : संजयनगर मधील घटना.
सांगली, जनप्रवास
SANGLI : पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलेला दोघांनी लुटले : संजयनगर परिसरातील चिन्मय पार्क रोडवर निवृत्त शिक्षक असलेल्या एका वृद्ध महिलेला दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याची घटना घडली. या महीलेकडील सोन्याची बिल्वर आणि गळ्यातील चेन असा एकूण 2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सदर लुटीची घटना ही शनिवार दी. 20 एप्रिल रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी श्रीमती हौसा जांबु वांजुळे (वय 71 रा. अभयनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
SANGLI : पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलेला दोघांनी लुटले
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीमती हौसा वांजुळे या निवृत्त शिक्षिका असून त्या आपल्या कुटुंबीयांसह अभय नगर मध्ये राहतात शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास त्या चिनमय पार्क ते लक्ष्मी मंदिर चौकाकडे जाणार्या रस्त्यावरून चालत निघाल्या होत्या.
यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी त्यांना थांबवले.
आम्ही पोलीस आहोत असे सांगून संजयनगर मध्ये एका महिलेवर चाकूने हल्ला केलेला आहे. तुम्ही तुमच्या हातातील आणि गळ्यातील सोन्याचे दागिने काढून पिशवीमध्ये ठेवा असे सांगून वांजुळे यांचा विश्वास संपादन करत हौसा यांचे दागिने घेऊन पिशवीमध्ये ठेवण्याचा बहाण करत पिशवीला गाठ मारून सदरची पिशवी वांजुळे यांच्याकडे देऊन ते निघून गेले. पुढे गेल्यानंतर वांजुळे यांनी पिशवी पाहिली असता त्यामध्ये दागिने नव्हते.
घडलेल्या या घटनेनंतर हौसा वांजूळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
यावेळी अज्ञात दोघांनी हातचालाकीने हौसा वांजुळे यांच्याकडे असणारे 1 लाख 60 हजार रुपये किमती 40 ग्रॅम वजनाची 4 सोन्याची बिल्वर आणि 60 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा एकूण 2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केल्याचे उघड झाले. घडलेल्या या घटनेनंतर हौसा वांजूळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या लुटीच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती.
——————
सांगलीतील मारुती रोडवर दागिन्यांसह महिलेची पर्स लंपास :
सांगली : शहरातील मारुती रोडवर एका महिलेने दुचाकीला अडकवलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या पर्स मध्ये असलेले 44 हजारांचे दागिने आणि 400 रुपये रोख असा ऐवज चोरीला गेला. सदर चोरीची घटना ही शनिवार दि. 20 एप्रिल रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी निलोफर मन्सूर जमादार (वय 28 रा. किर्लोस्करवाडी) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की निलोफर जमादार या आपल्या कुटुंबीयांसह पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी येथे राहतात. शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी त्या कामानिमित्त दुचाकीवरून सांगलीमध्ये आल्या होत्या. दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास त्या खरेदी करण्यासाठी मारुती रोडवर आल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी स्वागत हॉटेल जवळ लावली होती. या दुचाकीच्या हँडलला त्यांनी पर्स अडकवली होती.
या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रक्कम होती. सदरची पर्स कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. यामध्ये 44 हजारांचे दागिनेनी 400 रुपये असा 44 हजार 400 रुपयांचा एकवच अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी निलोफर जमादार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांनी मिळतात गुन्हा दाखल केला आहे.
——————
सांगलीतील फर्निचरच्या दुकानात चोरी, घरावर मारला दगड :
सांगली : शहरातील टिबर एरिया येथे असणार्या संभाजी कॉलनी मधील एका फर्निचर दुकानाचे शटर उचकटून त्यात प्रवेश करत अल्युमिनयमचे 35 नग, लोखंडी शटर आणि सायकल असा एकूण 26 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. त्याचबरोबर मालकांच्या घरावर दगड मारल्याची घटना घडली. सदरची घटना ही शुक्रवार दी. 19 एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी अशोक चंद्रप्पा मासाळे (वय 46 रा. संभाजी कॉलनी, सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक मासाळे हे आपल्या कुटुंबीयांसह संभाजी कॉलनी येथे राहतात. टिंबर एरिया परिसरात त्यांचा अशोक फर्निचर दुकानाचा कारखाना आहे. शुक्रवार दीं. 19 एप्रिल रोजी सायंकाळी सात ते शनिवार दि. 20 एप्रिल रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारखान्याचे शटर उचकटून आत प्रवेश केला.
कारखान्यात ठेवलेले अल्युमिनियम चे मटेरियल, अल्युमिनियम 35 नग, लोखंडी शटर आणि सायकल असा एकूण 26 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. त्याच बरोबर मासाळे राहत असलेल्या बंगल्यावर दगड मारून नुकसान केले. घडलेल्या या घटनेनंतर मासाळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



