दिनेशकुमार ऐतवडे
sangli political news : चिन्ह बदलले तरी आमदारकी फिक्सच.. : यंदाच्या निवडणुकीत अनेक नेते पक्ष बदलून लढत आहेत. अनेकांना चिन्हासाठी पक्ष बदलावे लागत आहे तर अनेकांना उमेदवारी मिळत नसल्याने पक्ष बदलावे लागत आहे. पक्ष बदलले की चिन्ह बदलते त्यामुळे जनमानसात चिन्ह लवकर रूजत नाही. परंतु ऐनवेळी चिन्ह बदलूनही आमदारकी फिक्स ठेवण्यात जिल्ह्यातील आठ जणांना आजपर्यंत यश आले आहे.
sangli political news : चिन्ह बदलले तरी आमदारकी फिक्सच..
यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, जयंतराव पाटील, आर. आर. पाटील, संभाजी पवार, अनिल बाबर, शिवाजीराव नाईक, विट्याचे सदाशिवराव पाटील आणि अजितराव घोरपडे यांचे या आठ जणांनी चिन्ह बदलून निवडणूक लढविली आहे आणि आपली आमदारकी कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. जयंत पाटील यांचे यंदा तिसर्यांदा चिन्ह बदलले आहे.
वसंतदादा पाटील
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री भूषविलेले सांगलीचे डॉ. वसंतदादा पाटील यांनी अनेक टर्म आमदारकी भोगली आपल्या आयुष्यात त्यांचा कधीही पराभव झाला आहे. त्यांनी गाय वासरू, चरखा आणि हात या चिन्हावर निवडणूक लढवली परंतु त्यांना कधीही चिन्हाची अडचण आली नाही. माजी मंत्री राजारामबापू पाटील यांनीही चारवेळी आमदार झाले. त्यामध्ये काँग्रेस आणि जनता दलातून ते निवडून आले. त्यांचा एकदा पराभव झाला परंतु त्यांनाही कधी चिन्हाची अडचण आली नाही.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस आणि विरोधी जनता दल हे दोनच पक्ष होते. काँग्रेसकडून वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांनी सलग तीन निवडणुका लढविल्या आणि जिंकल्या. कालांतराने राजारामबापू काँग्रेसमधून बाहेर पडले आणि जनता दलात प्रवेश केला. त्यामुळे राजारामबापू काँग्रेस आणि जनता दलाच्या चिन्हावर निवडणूक लढविली आणि जिंकले. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसचेही चिन्ह बदलले. त्यामुळे वसंतदादांनीही काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस या दोन पक्षाच्य चिन्हावर लढले.
1999 मध्ये राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आणि शरद पवारांनी काँग्रेस सोडली.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्याच्याबरोबर जिल्ह्यातील जयंत पाटील, आर. आर. पाटील, अनिल बाबर आणि शिराळ्यातून शिवाजीराव नाईक यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळच्या निवडणुकीत त्यांचे चिन्ह बदलून घड्याळ हे चिन्ह मिळाले. परंतु त्यांनाही कोणतीच अडचण आली नाही. तिघेही मोठ्या मताधिक्याने घड्याळ या चिन्हावर निवडून आले. त्यापूर्वी ते काँग्रेसच्या हात या चिन्हावर निवडून येत होते.
कायम विरोधी गटातून निवडून येणार्या सांगलीचे आमदार संभाजी पवार यांनी जनता दलाची पाळेमुळे सांगलीत भक्कम केली. चार वेळा निवडून आलेल्या संभाजी पवारांनीही जनता दल आणि भाजपच्या चिन्हावर निवडून आले. त्यांनाही कोणतीच अडचण आली नाही. अनिल बाबर हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या निवडून आले. जयंत पाटलांचे यानिवडणुकीत हे तिसरे चिन्ह आहे. या अगोदर त्यांनी हात, घड्याळ या चिन्हावर निवडून आले आहे. यंदाच्या निवडणुकीत ते तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत.
त्यामुळे काही राजकारण्यांना चिन्हांची कधीच अडचण आली नाही. चिन्ह कोणतेही असो त्यांची आमदारकी फिक्स असे समीकरण झाले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.