मंगळवारी काँग्रेस कमिटीसमोर प्रचाराचा शुभारंभ
सांगली
sangli political news : भाजपच्या पराभवासाठी मैदानात, माघार नाही: जयश्रीताई पाटील : आमच्या घराण्याने 35 वर्षे सांगलीच्या जनतेची सेवा केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत थांबले, यावेळी संधी देण्याचा निर्णय झाला होता. पण संधी दिली नाही. अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अनेक पुरोगामी संघटना, जनता, कार्यकर्त्यांनी लढण्याची ताकद दिली आहे. त्यामुळे निवडणुकीतून माघार घेणार नाही. भाजपचा पराभव करणे हेच ध्येय असून पृथ्वीराज पाटील यांनी माघार घेऊन पाठिंबा द्यावा, असे मत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले. तर मंगळवारी काँग्रेस कमिटीसमोर प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
sangli political news : भाजपच्या पराभवासाठी मैदानात, माघार नाही: जयश्रीताई पाटील
जयश्रीताई पाटील म्हणाल्या, गेल्या विधानसभा निवडणुकीत थांबलो, यावर्षी संधी देण्याचे ठरले होते. पण संधी दिली गेली नाही. निवडणूक लढवावी का? यावर विचार झाला. कार्यकर्ते, जनतेशी संपर्क साधला. अनेकांनी निवडणूक लढविण्याची मागणी केली. जनतेच्या आग्रहामुळे उमेदवारी अर्ज दाखल आहे. सांगलीत भाजपचा पराभवचा करणे हेच आमचे ध्येय आहे. विधानसभा मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी चार दिवसांपूर्वी दूरध्वनी करून विधानपरिषदेची ऑफर दिली होती. गेल्या निवडणुकीत देखील महामंडळ व विधानपरिषदेची ऑफर दिली होती. मात्र त्यांच्याकडून फसवणूक झाली आहे.
त्यामुळे यावेळी विधानपरिषद नको थेट जनतेतून लढतो, असे त्यांना सांगितले आहे. तर या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन मला पाठिंबा द्यावा व त्यांना विधानपरिषद द्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर आमचे घराणे 35 वर्षे सांगलीच्या राजकारणात आहे. अनेक समस्यांची जाणीव आहे. वारणा उद्भव योजना, शेरीनाला यासह महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पश्चिम महाराष्ट्रात एकही महिला उमेदवार नाही.
त्यामुळे महिलांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आता लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवार दि. 5 रोजी सकाळी दहा वाजता काँग्रेस कमिटीसमोर प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. भाजपचे अपक्ष उमेदवार शिवाजी डोंगरे यांच्या पाठिंब्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे जयश्रीताई पाटील यांनी सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.