sangli political news : शांततेत लवकरच निर्णय घेऊ : जयश्री पाटील : विधानसभेच्या निवडणुकीत सर्वजण एकदिलाने लढलो तरी पराभव झाला. पण खचून जाऊ नका, पुन्हा जोमाने कामाला लागायचे आहे. योग्य वेळी शांततेत निर्णय घेऊ, असे सूतोवाच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी दिले. त्यामुळे ते काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
sangli political news : शांततेत लवकरच निर्णय घेऊ : जयश्री पाटील
सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री पाटील काँग्रेसकडून इच्छूक होत्या. मात्र ऐनवेळी पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या जयश्री पाटील यांनी निवडणुकीत बंडखोरी केली होती. शिवाय काँग्रेस पक्षाने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. सोमवारी स्व. मदनभाऊ पाटील यांची जयंती होती. या जयंतीनिमित्त स्व. मदनभाऊ पाटील यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले. यावेळी जयश्री पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या, नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी पूर्ण ताकतीने प्रामाणिकपणाने माझ्याबरोबर काम केले आहे. तरी देखील पराभव झाला. या पराभवावर कोण काय बोलतय? याकडे लक्ष देऊ नका, खचून जाऊ नका. आपल्या पुन्हा जोमाने कामाला लागायचे आहे. तुम्ही माझ्याबरोबर प्रामाणिकपणाने थांबला इथून पुढे तुमच्या प्रत्येक कामात मी तुमच्या बरोबर असणार आहे. तसेच योग्य वेळेला आपण योग्य निर्णय आपल्या सर्वांच्या विचाराने घेऊ, काळजी करू नका, असे कार्यकर्त्यांना आश्वस्थ केले.
तर निवडणुकीमध्ये सांगलीकर जनतेसाठी जाहिरनामा तयार केला होता. त्यामुळे सांगलीकर जनतेला जे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी असतील प्रशासन असेल यांच्याबरोबर आपण पाठपुरावा करून नागरिकांच्या कामासाठी पुन्हा जोमाने कामाला लागा, अशा सूचना देखील जयश्री पाटील यांनी दिल्या.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.