rajkiyalive

sangli political news :आ. जयंत पाटील, खा. विशाल पाटील, आ. विश्वजित कदम यांच्या ऐतिहासिक भेटीमुळे नवे समीकरणे?

दिनेशकुमार ऐतवडे

sangli political news :आ. जयंत पाटील, खा. विशाल पाटील, आ. विश्वजित कदम यांच्या ऐतिहासिक भेटीमुळे नवे समीकरणे? : सांगली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या वाढत्या पावसामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व महाआघाडीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपने गावोगावी वाड्या-वस्त्यांवर पाय रोवायला सुरुवात केल्याने विरोधकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. मात्र, विधानभवनाच्या गाभार्‍यात अचानक झालेल्या आ. जयंतराव पाटील आणि खा. विशाल पाटील आणि आ. विश्वजित कदम यांच्या ऐतिहासिक भेटीमुळे महाआघाडीच्या गोटात पुन्हा आत्मविश्वास जागा झाला आहे.

sangli political news :आ. जयंत पाटील, खा. विशाल पाटील, आ. विश्वजित कदम यांच्या ऐतिहासिक भेटीमुळे नवे समीकरणे?

महाआघाडीत चैतन्य, भाजपला पेच!

सांगली महापालिकेच्या आगामी निवडणुका तसेच जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम कधीही वाजू शकतात. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजप व शिंदे गटाकडून जिल्ह्यात आक्रमक पवित्रा घेतला जात असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यासाठी ही निवडणूक केवळ राजकीय अस्तित्वाचीच नव्हे तर प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे.

गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील अनेक प्रभावशाली नेत्यांनी भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश करून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांमध्ये खिंडार घालण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः सांगली महापालिकेच्या राजकारणात ज्यांचा ठसा होता अशा मदन पाटील गटातील महत्त्वाच्या नेत्या जयश्री पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेससाठी मोठा धक्का दिला आहे. जयश्री पाटील यांच्या निर्णयामुळे सांगलीत काँग्रेसची संघटनात्मक घडी विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर सांगलीतील काँग्रेसची धुरा आता माजी आमदार विशाल पाटील यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता असून, जिल्हास्तरावरील समन्वय आणि नेतृत्वाची जबाबदारी आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे येणार आहे. दोघेही अनुभवसंपन्न, कार्यक्षम आणि जनाधार असलेले नेते आहेत. मात्र या राजकीय संघर्षात त्यांना माजी मंत्री जयंत पाटील यांची मोलाची साथ आवश्यक ठरणार आहे.

जयंत पाटील हे केवळ राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नसून सांगली जिल्ह्यातील एक प्रभावी राजकीय चेहरा म्हणून त्यांची प्रतिमा आहे.
याच संदर्भात मुंबईत या तिघांमध्ये नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली . ही भेट केवळ सौजन्याची नसून आगामी निवडणुकांतील संभाव्य आघाडी, समन्वय आणि रणनीतीसंदर्भात झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाली असून, भाजपच्या विजय रथाला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून एक सशक्त आणि समविचारी आघाडी उभी राहू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या त्रिकोणी समन्वयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण उभे राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजप व शिंदे गटाचा सामना करायचा असेल, तर मतभेद विसरून एकसंघपणे लढावे लागणार आहे. येणार्‍या काळात सांगली महापालिकेतील राजकीय चित्र कसे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही भेट केवळ औपचारिक हस्तांदोलन नव्हती, तर सांगलीच्या राजकारणात नवे समीकरणे बांधण्याची नांदी होती. जयंतरावांचे अनुभवसंपन्न नेतृत्व आणि विशालदादांचा आणि विश्वजित कदम यांचा ठाम जनाधार जर एकत्र आले, तर भाजपला जिल्ह्यात तगडे आव्हान उभे राहील, अशी स्पष्ट चर्चा आता सुरू झाली आहे.

sangli-political-news-new-equations-due-to-the-historic-meeting-of-a-jayant-patil-kha-vishal-patil-a-vishwajit-kadam

महापालिका निवडणुकांच्या पायरीवर भाजपला थोपवण्यासाठी महाआघाडीत नव्याने बैठकांचे दौरे, गुप्त चर्चा आणि जागा वाटपावर रणनीती आखली जात आहे. जयंतराव आणि डॉ. विश्वजित कदम आणि विशालदादांची भेट या प्रक्रियेत एक निर्णायक टप्पा ठरत आहे.
महानगराच्या सभागृहाबाहेर कॅमेर्‍यांचे फ्लॅश झगमगले, सभागृहात दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाली, आणि ‘इनकमिंग’च्या चर्चा अधिक जोर धरू लागल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना या भेटीतून नवा हुरूप मिळाला आहे.

जयंतरावांचे मोजके पण ठाम शब्द, विशालदादांचा आत्मविश्वास, आणि दोघांच्या हातमिळवणीमुळे कार्यकर्त्यांना असा विश्वास वाटतो की – ‘‘हीच ती वेळ, आता भाजपला रोखायचंच!’’ सांगलीच्या गल्लीपासून दिल्लीच्या चर्चांपर्यंत ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे. महापालिकेतील वटवृक्षाखाली नव्या फांद्या फुटल्या आहेत. जयंतराव-विशालदादा-विश्वजित कदम यांची तिकडी जर एकत्र आली, तर महाआघाडीच्या झेंड्याखाली पुन्हा सत्ता येईल, असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये पसरला आहे.

हजारो कार्यकर्त्यांच्या नजरा या भेटीकडे लागल्या होत्या. त्यांना वाटलं, ‘‘हा क्षण काहीतरी मोठं ठरवणार आहे.’’ आणि खरंच, या भेटीने सांगलीच्या राजकारणात नवे वादळ उठवलं आहे. आता सभागृहात शांतता असली तरी महाआघाडीच्या गोटात वीजांचा कडकडाट सुरू आहे.
ही भेट म्हणजे सांगलीच्या राजकारणाला नवी दिशा देणारी, भाजपला रोखण्यासाठी आखलेली पहिली ठोस चाल ठरत आहे. आता सर्वांच्या नजरा या नव्या समीकरणांच्या पुढील पावलांकडे लागल्या आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज