rajkiyalive

sangli political news : युवा नेत्यांच्या आमदारकीची प्रतिक्षा केंव्हा संपणार?

जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे

sangli political news : युवा नेत्यांच्या आमदारकीची प्रतिक्षा केंव्हा संपणार? : सांगली : विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. पक्षांतराचे वारे अनेक ठिकाणी वाहत आहेत. अनेकांनी आपआपले पक्ष सोडून तिकीटसाठी दुसर्‍या पक्षात प्रवेश करीत आहेत. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघ आहेत. जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, सुरेश खाडे, विक्रम सावंत, विश्वजित कदम, सुधीर गाडगीळ, सुहास बाबर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. तासगाव कवठेमहांकाळमधून रोहित पाटील पहिल्यांदाच राष्ट्रवादीकडून उतरले आहेत. पण चिंता लागून राहिली आहे, ती युवा नेत्यांमधून. गेल्या पाच दहा वर्षापासून अनेक आंदोलने, विकासकामे, जनसंपर्काच्या माध्यमातून युवा नेते आमदारकीची तयारी करीत होते. परंतु अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. सर्वच पक्षात युवा नेत्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. काहींनी उमेदवारी नाही मिळाली तर मात्र बंडखोरी करण्याची तयारीही ठेवली आहे.

sangli political news : युवा नेत्यांच्या आमदारकीची प्रतिक्षा केंव्हा संपणार?

सांगली विधानसभा मतदार संघ भाजपकडे आहे. येथे भाजपने पुन्हा एकदा सुधीर गाडगीळ यांनाच उतरवले आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्या
मनात चलबिचल सुरू आहे. खरी अडचण झाली ती पृथ्वीराज पवार यांची. संभाजी पवारांनी चार वेळा आमदारकी गाजवली. परंतु त्यांचा फायदा पृथ्वीराज पवारांना घेता आला नाही. जनता दल ते भाजपा व्हाया शिवसेना असा प्रवास केलेल्या पृथ्वीराज पवारांना सांगलीमधून भाजपकडे उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला.

तासगाव कवठेमहांकाळमधून मात्र अपेक्षेप्रमाणे रोहित पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधात माजी खासदार संजयकाका पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांचे चिरंजिव प्रभाकर पाटील यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे.

जतमध्ये सध्या काँग्रेसचे विक्रम सावंत विद्यमान आमदार आहेत. येथे पुन्हा एकदा त्यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. परंतु विरोधी भाजपमध्ये उमेदवारीसाठी रांग लागली आहे. माजी आमदार विलासराव जगताप, प्रकाश जमदाडे यांच्या बरोबर सध्या चर्चेत असणारे नाव म्हणजे तमणगौंडा रवीपाटील. रवीपाीटल यांचे पक्षातील वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे आपणाला तिकीट मिळेल असे पाटील यांची खात्री वाटत आहे. परंतु भाजप येथे गोपीचंद पडळकर यांना उतरविण्याच्या तयारीत आहेत. त्यांना मात्र जतसासियांनी विरोध केला आहे.

पलूस कडेगावमध्ये पारंपरिक विरोधक संग्रामसिंह देशमुखही फार दिवसापासून आमदारकीच्या प्रतिक्षेत आहेत. येथे आता शरद लाड यांचीही भर पडली आहे. सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार विश्वजित कदम यांनाच काँग्रेसची उमेदवारी निश्चित केली आहे. विरोधी भाजपकडूनही संग्राम देशमुखांना उमेदवारी मिळेल परंतु खरी अडचण आहे ती चिन्हाची. हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे ऐनवेळी संग्राम देशमुख यांना शिवसेनेच्या चिन्हावर लढावे लागणार आहे. शरद लाड काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिराळा मतदार संघात सम्राट महाडिक यांनी गेल्या वर्षी जोरदार टक्कर दिली होती. भाजपने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी भरून सवार्र्ंना घाम फोडला होता. गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदार संघात जनसंपर्क वाढविला आहे. यंदा कोणत्याही परिस्थिीत मैदान मारायचेच असा चंग त्यानीं बांधला आहे. परंतु येथे उमेदवारीचा घोळ अद्याप सुरूच आहे. येथे सत्यजित देशमुख यांनीही उमेदवारीसाठी धडपडत आहेत.

इस्लामपूर मतदार संघात गेल्या सात निवडणुकांमध्ये जयंत पाटील यांनी बाजी मारली आहे.

आठव्यांदा त्यांनी अर्ज दाखल केला आहे. विरोधी पक्षातर्फे निशिकांत पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उभे आहेत. त्यामुळे गौरव नायकवडी, राहूल महाडिक, विक्रम पाटील, आनंदराव पवार यांना शांत बसावे लागणार आहे.

खानापूर मतदार संघात सुहास बाबर यांना शिंदे सेनेने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील उमेदवारीच्या प्रतिक्षेत आहेत. येथे ब्रम्हानंद पडळकरही ऐनवेळी मैदानात उतरू शकतात, अशी शक्यता आहे.
एकंदरीत दुसर्‍या फळीतील अनेक नेते आमदारकीच्या प्रतिक्षेत असताना युवा नेत्यांनाही आपण आमदार व्हावे असे वाटत आहे. निवडणुकीच्या रणांगणात निवडणुकीच्या शेवटच्या तारखेपर्यंत काहीही होवू शकते. त्यामुळे कोण कोणाबरोबर जाणार आणि कोण कुणाला मदत करणार हे त्याचवेळी कळेल. यंदाच्या निवडणुकीत अनेक युवा नेत्यांना आपल्या इच्छेवर पाणी फिरवावे लागणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज