rajkiyalive

SANGLI : पुढील तीन दिवसात पारा 42 च्या पुढे जाणार

सूर्य आग ओकतोय, सांगली तापली

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI : पुढील तीन दिवसात पारा 42 च्या पुढे जाणार : सांगली शहराच्या तापमानात काही दिवसांपासून वाढ होत चालली आहे. सूर्य आग ओकत असून मंगळवारी तापमान 41 अंश सेल्सिअस पार गेले होते. त्यामुळे हवेत प्रचंड उकाडा जाणवू लागला असून अंगाची लाही लाही लाही होत होती. वाढत्या उन्हामुळे दुपारी रस्ते ओस पडू लागले आहेत. पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

SANGLI : पुढील तीन दिवसात पारा 42 च्या पुढे जाणार

सांगली शहर परिसरात एप्रिलअखेर प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे. तापमानाचा पारा आता चांगलाच वर जात असून सकाळ नऊ वाजल्यापासून उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. गेल्या आठवड्यापासून शहरातील किमान तापमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे प्रचंड उकाड्याचा त्रास नागरिकांना जाणवत होता. तर दिवसभर सांगलीकरांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दुपारी दुचाकीवरून जाताना चांगलाच चटका जाणवतो. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे रात्री देखील गरम हवा त्रासदायक ठरत आहे.

वाढत्या तापमानामुळे दुपारी रस्त्यावरची गर्दी तुरळक होऊ लागली आहे.

तापमानात वाढ झाल्याने थंड पेयांची मागणी वाढली आहे. चौका-चौकातील गाड्यांवर शीतपेये, उसाचा रस, ज्यूस यासाठी गर्दी होत आहे. दुपारी कामासाठी बाहेर पडणारा प्रत्येकजण चेहर्‍याला स्कार्फ बांधूनच बाहेर पडत होता. उन्हाची लाही वाढत असल्याने टोप्या व गॉगलना मागणी वाढली आहे. सध्या बाजारात 30 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत टोप्या मिळतात. गॉगलच्या किमतीही शंभर रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत आहेत.

उन्हाचा पारा वाढल्याने उष्माघात, ताप या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.

खासगी व शासकीय रुग्णालयांत रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. शहरी भागात उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण होत आहेत. चार-पाच दिवसांमध्ये आणखी तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होणार आहे. शिवाय वाढत्या उष्णतेमुळे डोकेदुखी, थकवा, डिहायड्रेशन, हिट स्ट्रोक, त्वचेसंबंधित विविध आजार देखील वाढले आहेत

पुढील दहा दिवसात असे राहील तापमान
बुधवार- 41
गुरूवार- 41
शुक्रवार- 41
शनिवार- 42
रविवार- 42
सोमवार- 38
मंगळवार- 38

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज