rajkiyalive

SANGLI RAILWAY : रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी देणार्‍याच्या आवळल्या मुसक्या

 सांगली शहर पोलिसांनी सीएसटी मुंबई येथे केली कारवाई.

SANGLI RAILWAY : रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी देणार्‍याच्या आवळल्या मुसक्या : सांगली : मिरज, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह अन्य रेल्वेस्टेशन बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देणार्‍या सराईत तरुणाच्या सांगली शहर पोलिसांनी मुंबई लोहमार्ग पोलीस यांच्या मदतीने मुसक्या आवळण्यात यश आले. सचिन मारुती शिंदे उर्फ माधव किसन भिसे (वय 35 रा. तरटगाव जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, त्याने हे कृत्य वैफल्यग्रस्त होऊन केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

SANGLI RAILWAY : रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी देणार्‍याच्या आवळल्या मुसक्या

SANGLI RAILWAY : रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी देणार्‍याच्या आवळल्या मुसक्या : याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने निनावी फोन करून तो दहशतवादी असून त्याच्या सोबत अन्य पाच व्यक्ती आहेत. आम्ही आरडीएक्स बॉम्ब रेल्वे स्टेशन परिसरात ठेऊन सदरचे स्टेशन बॉम्बने उडवून देणार आहोत. आमची माणसे मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे याठिकाणी पोहोचली असून त्याठिकाणी बॉम्ब स्फोट करणार असल्याची धमकी दिली.

पोलीस ठाण्याला फोन आला त्या फोनचे डिटेल्स काढण्यात आले.

यानंतर तातडीने घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी सांगली आणि मिरज रेल्वे स्टेशन परिसरात धाव घेत तपासणी केली मात्र, काही हाती लागले नाही. यानंतर धमकी देणार्‍या अज्ञात व्यक्ती विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यांनतर पोलिसांनी तपास सुरु केला. ज्या नंबरवरून सांगली शहर पोलीस ठाण्याला फोन आला त्या फोनचे डिटेल्स काढण्यात आले.

सदरचा मोबाईल हा सोलापूर जिल्ह्यातील एका अंध पती-पत्नीचा असल्याचे पुढे आले.

सदरचे पती पत्नी हे रेल्वेने मुंबईला जात होते. यावेळी त्यांचा मोबाईल चोरीला गेला. यानंतर तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपास करून पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील यांनी संशयित सचिन शिंदे उर्फ माधव भिसे याच्या रेल्वे पोलिसांच्या मदतीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) येथून अटक केली.

वैफल्यग्रस्त होऊन सदरचे कृत्य केल्याचे त्याने सांगितले.

त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता वैफल्यग्रस्त होऊन सदरचे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, अटकेतील शिंदे-भिसे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असून तो जेल मध्ये जाऊन आल्याची माहिती मिळाली. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण, मछिंद्र बर्डे, संदीप पाटील, गौतम कांबळे, संतोष गळवे, योगेश सटाले, सचिन शिंदे, संदीप कुंभार, विनायक शिंदे, गणेश कांबळे यांच्या पथकाने केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज