sangli rationcard news : केवायसी न केल्यास धान्य बंद होणार, 28 फेबु्रवारीपर्यंत केवायसीसाठी मुदत : जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांना धान्यांसाठी ई-केवासी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्ह्यात 18 लाख 48 हजार 365 रेशनकार्डच्या लाभार्थ्यांची संख्या आहे. यापैकी पाच लाख 93 हजार 255 लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घेतलेली नाही. जवळपास 65.25 टक्के पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहू शकतात.28 फेब्रुवारी ही ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
sangli rationcard news : केवायसी न केल्यास धान्य बंद होणार, 28 फेबु्रवारीपर्यंत केवायसीसाठी मुदत
अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण केले जाते. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात एकूण 18 लाख 48 हजार 365 रेशनकार्डच्या लाभार्थ्यांची संख्या आहे. यापैकी पाच लाख 93 हजार 255 लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घेतलेली नाही. जवळपास 65.25 टक्के पात्र लाभार्थी ई-केवायसी करून घेणार नाहीत ते धान्यापासून वंचित राहू शकतात.
शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या संलग्न रेशन दुकानांमधून प्रत्यक्ष आधारकार्ड दाखवून अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण अर्थात ई-केवायसी करणे आवश्यक आहे.28 फेब्रुवारी ही ई-केवायसी करून घेण्याची शेवटची तारीख आहे. केवायसी न करणार्या रेशनकार्डधारकांचे धान्य बंद केले जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व रेशन धान्य दुकानदारांनी प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला अन्न दिवस साजरा करून लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरू करावे. कोणत्याही परिस्थितीत दर महिन्याच्या 15 तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण करावे, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



