rajkiyalive

SANGLI : सांगलीतील सावकाराने 40 हजारासाठी 1 लाख 94 हजार उकळले

घरात घुसून दिली धमकी : खाजगी सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.

SANGLI : सांगलीतील सावकाराने 40 हजारासाठी 1 लाख 94 हजार उकळले : सांगली : शहरातील एका तरुणास हॉटेल व्यवसायासाठी प्रति महिना दहा टक्के व्याजाने 40 हजार रुपये देऊन त्यापोटी 1 लाख 94 हजार 920 रुपये घेऊनही अधिकच्या 40 हजार रुपये देण्यासाठी हॉटेल मध्ये घुसून धमकी देत नुकसान केल्याची घटना घडली.

SANGLI : सांगलीतील सावकाराने 40 हजारासाठी 1 लाख 94 हजार उकळले

सदरची घटना हि दि. 17 जून 2021 ते सोमवार दि. 20 मे रोजी सीताराम नगर, सराफ कट्टा आणि शिवाजी मंडई येथे घडली. या प्रकरणी अभिषेक नारायण देवाडिगा (वय 30 रा. संजयनगर) याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सावकारी अधिनियम अंतर्गत धनंजय अरुण पोतदार (रा. खणभाग) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रति महिना दहा टक्के व्याजाने 40 हजार रुपये घेतले होते.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अभिषेक देवाडिगा हे आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसरात राहतात. अभिषेक यांनी हॉटेल व्यवसायासाठी संशयित धनंजय पोतदार यांच्याकडून प्रति महिना दहा टक्के व्याजाने 40 हजार रुपये घेतले होते. संशयित पोतदार यांनी बेकायदेशीर सावकारी करून 1 लाख 94 हजार 920 रुपये इतकी रक्कम रोख आणि गुगल पे स्वरूपात वसूल केली आहे. देवाडिगा यांचा मोबाईल धमकी देऊन तो काढून घेत स्वतःसाठी वापरला.

सदरची रक्कम दिली नाही म्हणून हॉटेलची फरशी तोडून नुकसान केले

संशयित पोतदार यांनी घरात घुसून अजून शिल्लक मुद्दल 40 हजार रुपयांची मागणी करून सदरची रक्कम दिली नाही म्हणून हॉटेलची फरशी तोडून नुकसान केले. सदरची घटना हि दि. 17 जून 2021 ते सोमवार दि. 20 मे 2024 या कालावधीत सराफ कट्ट्यातील पोतदार ज्वेलर्स, सीतारामनगर आणि शिवाजी मंडई येथे घडली. वारंवार होणार्‍या त्रासाला कंटाळून देवाडिगा यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पोतदार यांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज