rajkiyalive

SANGLI : शहरात बहुमजली इमारती पण मनपाकडे नाही आपत्कालिन यंत्रणा

अग्निशमन विभागाकडे अत्याधुनिक यंत्रणेची गरज

जनप्रवास । सांगली

SANGLI : शहरात बहुमजली इमारती पण मनपाकडे नाही आपत्कालिन यंत्रणा : महापालिका क्षेत्रात बहुमजली इमारती होऊ लागल्या, पण या इमारतींची सुरक्षा करण्यासाठी असलेली अग्निशमन यंत्रणा मात्र कमजोर असल्याचे चित्र आहे. सांगली शहरात 10 मजल्यावर इमारती तयार होत आहे. मात्र सात मजल्यापर्यंतची आपत्कालिन यंत्रणा सध्या मनपाकडे आहे. त्यामुळे अत्याधुनिक फायर फायटरची आवश्यकता महापालिकेला आहे.

SANGLI : शहरात बहुमजली इमारती पण मनपाकडे नाही आपत्कालिन यंत्रणा

SANGLI : शहरात बहुमजली इमारती पण मनपाकडे नाही आपत्कालिन यंत्रणा : महापालिका क्षेत्रात शॉर्टसर्किट, गॅस गळती, निष्काळजीपणा आदी प्रमुख कारणांमुळे आगी लागत आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीने प्रयत्न करतात. प्रसंगी जीव धोक्यात घालून मोठ्या धैर्याने आग आटोक्यात आणतात. आगीचा व धुराचा सामना करणे सोपे नसते. अंगी धैर्य असावे लागले. हे धैर्य आणि उच्च शारिरिक व मानसिक स्थिती अग्निशमन दलाच्या जवानांमध्ये असते. गेल्या वर्षात तीनशेहून अधिक आगीच्या घटना घडला. शिवाय महापालिका क्षेत्राबाहेर 30 हून अधिक घटना घडला आहे. या आगी आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केले. आहे त्या यंत्रणेवर कर्मचारी आपला जीव धोक्यता घाऊन काम करत आहेत.

SANGLI : शहरात बहुमजली इमारती पण मनपाकडे नाही आपत्कालिन यंत्रणा : महापालिका क्षेत्रात आता 20 मजल्यांच्यावर इमारती उभ्या राहणार आहेत.

एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमुळे महापालिका क्षेत्रात आता 20 मजल्यांच्यावर इमारती उभ्या राहणार आहेत. मिरजेतील किल्ला भागात 22 मजली इमारतीचे काम सुरू आहे. सांगली येथील उष:काल हॉस्पिटल देखील 12 मजल्याचे आहे. पण अग्निशमन विभागाकडे केवळ सात मजल्यापर्यंतची (24 मीटर) यंत्रणा आहे. सांगली शहरातील धमाणी रोड, मिरजरोड, विजयनगर आदी परिसरात आता दहा मजल्यांच्यावर इमारती होऊ लागल्या आहेत.

मात्र या इमारतीची सुरक्षा करण्यासाठी असलेली सक्षम यंत्रण अग्निशमन विभागाकडे नसल्याचे दिसून येत आहे. सात ते आठ मजल्यावरची यंत्रणा केवळ अग्निशमन विभागाकडे आहे. त्यामुळे भविष्यात दहा मजली इमारतीवर संकट निर्माण झाले? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. उंच इमारतीची आग आटोक्यात आणणे, रेस्कू करणे यासाठी टर्न टेबल लँडर अग्निशमन वाहनाची गरज आहे.

SANGLI : शहरात बहुमजली इमारती पण मनपाकडे नाही आपत्कालिन यंत्रणा : महापालिका क्षेत्राची लोकसंख्या पाहता हे मनुष्यबळ अपुरे आहे.

या शिवाय कर्मचार्‍यांचा प्रश्न तर कायमच आहे. मुख्य अग्निशमन अधिकार्‍यांसह 69 कर्मचार्‍यांनी आगीविरोधात दोन हात करतात, पण महापालिका क्षेत्राची लोकसंख्या पाहता हे मनुष्यबळ अपुरे आहे. महापालिकेचा नुकताच आकृतीबंध मंजूर झाला आहे. त्यामध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, केंद्र अधिकारी या प्रमुख पदांसह 156 फायरमन व 48 वाहनचालक अशी पदे मंजूर झाली आहेत.

मात्र अद्याप भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे हे पद रिक्तच आहेत. आगीच्या घटनेबरोबर लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्ति, दरवाजा लॉक होऊन अडकलेले लहान बाल, विहिरीत पडलेल्या जनावरांची सुटका, पक्षांची सुटका यासह इतर अपघातात देखील अग्निशमन दलाचे जवान काम करतात. त्यामुळे आवश्यक ती यंत्रणा व कर्मचारी अग्निशमन विभागाला आवश्यक आहेत.

महापालिकेची अग्निशमन यंत्रणा
अग्निशमन विभागाची यंत्रणा व कर्मचारी
फायर फायटर गाड्या- 7
मिनी फायटर गाड्या- 1
रेक्सी व्हॅन- 1
फायरमन- 36
वाहनचालक- 26

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज