केंद्राकडून कारखान्यांसाठी कोटा निश्चित, ऊसाला चांगला भाव देण्याची शरद जोशी संघटनेची मागणी
sangli sugar news : सांगली जिल्ह्यातून 3.23 लाख क्विंटल साखर होणार निर्यात : चालू हंगामामध्ये केंद्र सरकारने सांगली जिल्ह्यासाठी निर्यात साखरेचा कोटा निश्चित केला आहे. त्याबाबतचे आदेश केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्यावतीने काढले असून सांगली जिल्ह्यासाठी 3 लाख 23 हजार 280 क्विंटल साखर निर्यातील मान्यता देण्यात आली आहे. निर्यात सुलभ होऊन देशांतर्गत साखर साठा कमी होईल, त्यामुळे साखरेचे भाव पडण्याचा धोका नाही. त्यामुळे चालू गाळप हंगामात चांगला भाव मिळण्यात कोणतीही अडचण नसून तो साखर कारखानदारांनी द्यावा, अशी मागणी शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी केली.
sangli sugar news : सांगली जिल्ह्यातून 3.23 लाख क्विंटल साखर होणार निर्यात
केंद्र सरकारने 2024 -25 गाळप हंगामातील एकूण 10 लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यासाठी ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने प्रत्येक साखर कारखान्याला साखरेचा निर्यात कोटा ठरवून दिला आहे. त्यातील सांगली जिल्ह्यातील कारखान्यांसाठी 3 लाख 23 हजार 280 क्विंटल इतका निर्यात कोटा आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने आदेशात म्हणले आहे की, कोणत्याही ग्रेडची साखर निर्यात करता येईल.
साखर आयुक्तालयाच्या परवानगीने निर्यात करु शकतात.
कारखान्याच्या गेल्या तीन वर्षातील 2021-22, 22-23 आणि 23-24 हंगामात उत्पादित साखर सरासरीच्या 3.174 टक्के साखर निर्यातीला परवानगी आहे. जे कारखाने गेले तीन वर्षात चालू नव्हते व 2024-25 चा हंगाम घेत आहेत, ते साखर आयुक्तालयाच्या परवानगीने निर्यात करु शकतात. साखर कारखाने स्वतः, निर्यातदार व रिफायनरीद्वारे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत निर्यात करतील. जे कारखाने बंदरापासून लांब आहेत व त्यामुळे वाहतूक खर्च जास्त होतो, असे कारखाने (पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश मधील) 31 मार्च 2025 पूर्वी आपला पूर्ण किंवा ठराविक कोटा दुसर्या कारखान्याला देऊ शकतात.
बंदराजवळचे कारखाने जादा साखर निर्यात करु शकतात.
त्या बदल्यात त्यांचा देशांतर्गत विक्रीचा तेवढाच साखर कोटा ते बंदरापासून लांबच्या कारखान्याला देतील. मात्र असा करार अन्न व सार्वजनिक वितरण विभागाला सादर करावा लागेल. अशी देशांतर्गत विक्रीसाठी जादा मिळालेला कोटा त्या कारखान्यांनी 30 सप्टेंबरपासून पुढील पाच सलग महिन्यात विकावी लागणार आहे. ज्या कारखान्यांनी कोटा बदलून घेतला आहे. त्यांना कोट्यात पुन्हा बदल करता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात गेल्या हंगामातील याच कालावधीपर्यंत 69.90 लाख टनाच्या तुलनेत यंदा 58.60 लाख टन व कोल्हापूर विभागात 16 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर देशात आतापर्यंत 166 लाख टन उत्पादन झाले आहे.
कारखान्यांचा निर्यात कोटा (क्विंटलमध्ये)
कारखाना निर्यात कोटा
दत्त इंडिया 36,400
राजारामबापू साखराळे 34,860
सर्वोदय कारंडवाडी 16,530
राजारामबापू वाटेगाव 20,790
विश्वास शिराळा 21,680
हुतात्मा वाळवा 20,610
भारती शुगर नागेवाडी 4,800
दालमिया कोकरुड 19,590
क्रांती कुंडल 34,910
मोहनराव शिंदे आरग 12,800
उदगिरी पारे 22,580
श्री श्री 20,580
सोनहिरा वांगी 38,720
तुरची कारखाना 3,900
राजारामबापू जत 9,070
केन अॅग्रो रायगाव 5460

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



