rajkiyalive

sangli vidhansabha 2024 : काँग्रेसमध्ये गटबाजीचा भाजपकडून डाव: पृथ्वीराज पाटील

2019 च्या निवडणुकीतील शब्दावर योग्य वेळी बोलू

जनप्रवास । प्रतिनिधी
sangli vidhansabha 2024 : काँग्रेसमध्ये गटबाजीचा भाजपकडून डाव: पृथ्वीराज पाटील : लोकसभेत अपयश आल्याने विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सावध झाले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काठावरच्या आमदारांसाठी महाविकास आघाडीमध्ये मतविभागणीसाठी काँग्रेसमध्ये गटबाजी करण्याचा डाव भाजपकडून आखला जात आहे. सांगलीत देखील भाजपचा हाच प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला. तर जयश्रीताई पाटील यांचयाबद्दल आदर आहे. माजी नगरसेवकांनी 2019 च्या निवडणुकीत शब्द दिला होता असे बोलत आहेत, त्यावर योग्य वेळी बोलू, असे म्हणून त्यांनी उत्तर देणे टाळले.

sangli vidhansabha 2024 : काँग्रेसमध्ये गटबाजीचा भाजपकडून डाव: पृथ्वीराज पाटील

पृथ्वीराज पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात ‘संवाद सांगलीसाठी’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात 1990 पासून काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. वैद्यकीय सेलसह जिल्हा सरचिटणीस आदी पदांवर काम केले. 2014 ला सांगली शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर माजी मंत्री पतंगराव कदम यांनी दिली. गेल्या दहा वर्षात सांगलीच्या जनतेच्या सेवा करत आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली, कमी वेळेत प्रचार केला. पण जनतेने 87 हजार मते दिली. पराभव झाला तरी खचलो नाही. काम करत राहिले. जनतेच्या जोरावर यावर्षी देखील विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे. जयश्रीताई पाटील यांनी देखील विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. काँग्रेस पक्षात उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. त्यावर दिल्ली व मुंबईतील नेते निर्णय घेत असतात.

पण लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. त्यामुळे भाजपचा वाघ जखमी झाला आहे. त्यांच्याकडून आता महाविकास आघाडीमध्ये गटबाजीची खेळी केली जात आहे. राज्यात ज्या मतदारसंघात भाजप उमेदवाराचा निसटता विजय झाला आहे. त्या ठिकाणी त्यांच्याकडून ही खेळी केली जात आहे. त्यामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. भाजप विरूध्द काँग्रेस अशी थेट लढत न होता काँग्रेसमध्ये गटबाजीला खतपाणी घालून उमेदवार उभा कसा राहिल व गटबाजी कशी होईल,

यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. पण काँग्रेस पक्ष जसा लोकसभेला एकसंघ राहिला आहे. तसाच विधानसभेला राहील. सांगली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत नेते योग्य निर्णय घेतील, असे मत पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले.

तर 2019 च्या निवडणुकीत मी उभा राहणार आहे. आणि 2024 च्या निवडणुकीत जयश्रीताई पाटील यांना पाठिंबा देण्याचा मी शब्द दिला असल्याचे माजी नगरसेवक बोलत आहेत. जयश्रीताई पाटील यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे. त्यांचे घर माझे घर हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे त्यांच्यावर टिका करणार नाही. त्या पक्षाच्या नेत्या आहेत. भाजपला फायदा होईल असे काहीही मी करणार नाही. पण मागील निवडणुकीवेळी काय घडले होते याबाबत योग्यवेळी बोलणार असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत सांगलीतून काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळाली नाही. त्यामुळे आ. विश्वजीत कदम यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही, असे स्पष्ट आदेश दिले होते. पण विशाल पाटील अपक्ष उभे राहिल्यानंतरही काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकत्र ठेवत त्यांच्यासह मी प्रचारात सक्रिय होते, असे देखील पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.

2600 कोटींची कामे आमदारांनी कोठे केली?

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ हे स्वत: कार्यसम्राट म्हणतात. 2600 कोटी रूपयांची कामे केली असल्याचे ते सांगत आहेत. पण शहरात पूल बांधणे व रस्ते करणे म्हणजे विकास होत नाही. नागरिकांचे मुलभूत प्रश्न दहा वर्षात मार्गी लागले नाहीत. शहरातील रस्त्यांची आज काय अवस्था आहे. लोकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. विधीमंडळात सांगलीच्या प्रश्नांवर आमदारांनी एक शब्द देखील काढला नाही. महाविकास आघाडीच्या काळात सरकारने दिलेल्या निधी व विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न आ. सुधीर गाडगीळ करत असल्याचा आरोप पृथ्वीराज पाटील यांनी केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज