rajkiyalive

sangli vidhansabha election 2024 :काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून मैदानात: जयश्रीताई पाटील

पृथ्वीराज पाटलांनी शब्द पाळावा: विशाल पाटील बरोबर येतील

जनप्रवास । प्रतिनिधी
sangli vidhansabha election 2024 :काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून मैदानात: जयश्रीताई पाटील : सांगली विधानसभेसाठी गेल्यावेळी पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यास सहमती दर्शवली, त्यांनी देखील एकवेळ लढतो, असे सांगितले. त्यांनी दिलेला शब्द पाळावा. काँग्रेसची उमेदवारी मला मिळो अथवा न मिळो विधानसभेची निवडणूक लढणारच असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील ग्रीन सिग्नल दिला दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

sangli vidhansabha election 2024 :काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून मैदानात: जयश्रीताई पाटील

जयश्रीताई पाटील म्हणाल्या, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देताना 25 टक्के महिलांना संधी देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सांगलीत काँग्रेसची उमेदवारी मलाच मिळेल. प्रदेशच्या नेत्यांनीही मला निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले आहे. विधानसभा निवडणूक लढण्याबाबत माझा निर्णय यापूर्वीच झाला आहे. वर्षभरापूर्वी मी पक्षाच्या बैठकीत जाहीरपणे विधानसभा लढणार असल्याचे सांगितले होते, पक्षाला याची कल्पना दिली होती. त्यामुळे एनेवेळी उमेदवारी मागण्याचा प्रश्नच येत नाही.

मागील विधानसभा निवडणुकीत मी कॉग्रेसकडे उमेदवारी मागितली होती.

पण पृथ्वीराज पाटील यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळी मला थांबवले. स्वत: पृथ्वीराज पाटील यांनीही यंदा मी लढतो, पुढच्यावेळी तुम्ही निवडणूक लढा, असे सांगितले होते.

नेत्यांनीही तसा शब्द दिला होता. त्यामुळे आता मी माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही, पृथ्वीराज पाटील यांनी ठरल्याप्रमाणे यावेळी थांबावे. काँग्रेस पक्षाने देखील मेरीटचा विचार करून उमेदवारी द्यावी. पक्षाची उमेदवारी मला न दिल्यास माजी मंत्री मदन पाटील, खा. विशाल पाटील यांच्याप्रमाणे मीही अपक्ष म्हणून ही निवडणूक लढणार असल्याचे जयश्रीताई पाटील यांनी स्पष्ट केले. त्या पुढे म्हणाल्या, स्व. मदनभाऊ पाटील मंत्री असताना 2009 साली निवडणुका झाल्या.

यावेळी सांगली-मिरज दंगल झाली होती. या लाटेत मदनभाऊ पाटील यांचा पराभव झाला.

हा पराभव भाऊंच्या व कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता. या पराभवाचा कलंक आता पुसणार आहे. 2024 ची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असून निश्चितच विजय मिळणार असल्याचा विश्वास जयश्रीताई पाटील यांनी बोलताना व्यक्त केला.

यावेळी सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, कार्याध्यक्ष शीतल लोंढे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, माजी नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, अजित सूर्यवंशी, उदय पाटील, अमित लाळगे, प्रविण निकम आदी उपस्थित होते.

खा. विशाल पाटील, आ. विश्वजीत कदम पाठिंबा देणार…

गेल्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेत खा. विशाल पाटील यांनी यंदा पृथ्वीराज पाटील तुम्ही लढा पण पुढच्यावेळी आम्हाला उमेदवारी द्या, असे स्पष्ट सांगितले होते. लोकसभेच्या निवडणुकीत खा. विशाल पाटील यांचा जाहीरपणे प्रचार केला होता. मताधिक्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे सांगलीत खा. पाटील माझ्याबरोबर सक्रीय असतील. तर आ. विश्वजीत कदम देखील मलाच पाठिंबा देतील, असा विश्वास जयश्रीताई पाटील यांनी व्यक्त केला.

पोस्टरबाजीची सवय आम्हाला नाही….

वसंतदादा घराणे गेल्या चाळीस वर्षांपासून जनतनेच्या कामातच आहेत. सत्ता, पदे असो की नसो आम्ही नेहमीच लोकांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी सोडवत असतो. त्यांच्यासाठी काम करत असतो. मात्र आम्ही कधी पोस्टरबाजी करत नाही, अशा शब्दात जयश्रीताई पाटील यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना टोला लगाविला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज