दिनेशकुमार ऐतवडे
sangli vidhansabha news :सांगलीत जिंकण्यासाठी हवेत 90 हजार मते : सांगली विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होत आहे. 2004 च्या निवडणुकीप्रमाणे यंदाही विष्णुअण्णा घराण्याने काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी केली आहे. ज्या ज्या वेळी तिरंगी लढत होईल त्या त्या वेळी मताची विभागणी होते असे बोलले जाते परंतु मतदानाची आकडेवारी पाहिली असता यंदाच्या निवडणुकीत सांगली मतदार संघात जिंकण्यासाठी 90 हजार मतांची गरज आहे. ज्या उमेदवारला 90 हजार मते मिळतील तो उमेदवार विजयी होईल.
sangli vidhansabha news :सांगलीत जिंकण्यासाठी हवेत 90 हजार मते
सांगली विधानसभा मतदार संघात 3 लाख 55 हजार मतदार आहेत. त्यापैकी पुरूष मतदार 1 लाख 77 हजार 187 असून, महिला मतदार 1 लाख 77 हजार 818 आहेत. लढत चुरशीची होणार असल्याने येथे किमान 80 टक्के मतदान होईल. त्यामुळे साधारण 2 लाख 84 हजार अपेक्षित आहे. गेल्या तीन निवडणुकीत भाजपला अनुक्रमे 77 हजार, 80 हजार आणि 93 हजार अशी मते पडली होती. गेल्या निवडणुकीत दुरंगी लढत असल्याने भाजपला 93 हजार मते पडली. त्यामुळे भाजपला पडणारे मतदान 75 ते 80 हजार आहे. त्यामुळे आ. सुधीर गाडगीळ यांना जिंकण्यासाठी आणखी 10 ते 15 हजार मतांची गरज पडणार आहे.
गेल्या तीन निवडणुकीत काँग्रेसला अनुक्रमे 66 हजार, 66 हजार आणि 86 हजार इतके मतदान झाले आहे. काँग्रेसचे पारंपरिक मतदान 65 ते 70 हजार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांना जिंकण्यासाठी अजून 20 ते 25 हजार मतांची गरज आहे.
जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे. 2004 मध्ये मदन पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी त्यांना 66 हजार 563 मते मिळाली होती .त्यांच्या विरोधात भाजपच्या संभाजी पवारांना 39 हजार 796 मते मिळाली. तर काँगे्रसच्या दिनकर पाटील यांना 36 हजार 522 मते मिळाली होती. 2004 मध्ये भाजप एवढा मजबूत नव्हता. त्यामुळे यंदा जयश्री पाटील यांना निवडून यायचे असेल तर 90 हजाराचा टप्पा गाठावा लागणार आहे.
तिनही उमेदवारांना ग्रामीण भागात चांगले मतदान होणार आहे. सांगली शहरात जो उमेदवार आघाडी घेईल तो यशस्वी होईल, असे चित्र आहे. परंतु सांगली शहरात केवळ नाममात्र आघाडी घेवून चालणार नाही. निम्मे मतदान सांगलीत घ्यावे लागणार आहे. सांगली विधानसभा मतदार संघात तीन मातब्बर उमेदवार आहेत. त्यामुळे तिघात समान वाटणी होईल असे नाही. राजकारणात 1 अधिक 1 दोन होत नाही. प्रत्येक पक्षाचे व्होट बँक ठरलेले आहे. ते सोडून विरोधी पक्षाचे मतदान मोठ्या प्रमाणात घ्यावे लागणार आहे. तरच आमदारकी गळ्यात पडेल.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.