काही तासांवर मतमोजणी, मतमोजणी केंद्र, स्ट्राँग रुमला खडा पहारा
sangli vidhansabha news : एकवीस फेर्यात समजणार आठ आमदार “:जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता स ुरु होत आहे. सरासरी 21 फेर्या होणार आहेत. मतमोजणीला अवघे 24 तास उरल्याने राजकीय पक्षांची घालमेल झाली आहे. आठही विधानसभेच्या मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सरळ लढत झाली असल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातले आहेत. शनिवारी दुपारपर्यंत निकाल घोषित होईल, यासाठीही प्रशासनाकडून तयारी केली जात आहे, तर दुपार अकरानंतर निकालाचा कल समजू शकतो. या मतमोजणीसाठी सुमारे सहाशे कर्मचारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
sangli vidhansabha news : एकवीस फेर्यात समजणार आठ आमदार
जिल्ह्यात विधानसभेच्या आठ जागांसाठी बुधवारी सरासरी 71.57 टक्के मतदान झाले. पलूस-कडेगाव मतदारसंघात सर्वाधिक 79.02 टक्के तर सांगलीत सर्वात कमी 63.11 टक्के मतदानाची नोंद झाली. गत निवडणुकीपेक्षा यंदा पाच टक्क्यांनी मतदानात वाढ झाली. त्यामुळे वाढलेला टक्का कुणाला धक्का देणार हे पहावे लागणार आहे. 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक टेबलावर एक मतमोजणी अधिकारी, एक मतमोजणी सहायक व एक मायक्रो निरीक्षक आहेत. प्रत्येकी 14 टेबलांवर मतमोजणी होणार आहे. शिवाय, पोस्टल व ईटीपीडीएस यांचे टेबल स्वतंत्र राहणार आहेत.
मतमोजणीच्या 21 ते 25 फेर्या होणार आहेत,
मतमोजणीसाठी केंद्र शासनाचे अधिकारी व कर्मचारी आहेत. प्रत्येक टेबलावर एक मतमोजणी अधिकारी, एक मतमोजणी सहायक व एक मायक्रो निरीक्षक राहणार आहे. या सर्व मनुष्यबळाचे पहिले प्रशिक्षण आटोपले. दूसरे प्रशिक्षण 22 नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली. मतमोजणीसाठी सहाशे अधिकारी आणि कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आले आहेत. साधारणपणे टपाली मतदानासाठी पाच ते सात टेबल राहणार आहेत.
आठ विधानसभा मतदारसंघातील 25 लाख 36 हजार 65 मतदारांपैकी 20 लाख मतदारांनी मतदान केले.
मतदानानंतर ईव्हीएम आठ विधानसभा मतदारसंघातील गोदामामध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी खडा पहारा आहे. पहिल्या गेटवर सीएपीएफ, दुसर्या गेटवर स्टेट आर्म पोलिस फोर्स (एसएपीएफ) आणि गोदामाच्या गेटवर स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विधानसभेचा निकाल अवघ्या 24 तासांवर आला आहे. बुधवारी विविध वृत्त वाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यामध्ये धक्कादायक अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यमान विद्यमान आमदारांसह अन्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातले असून निकालाची उत्सुकता लागली आहे.
आठ मतदारसंघाच्या मतमोजणीचे ठिकाण
सांगली ः तरुण भारत क्रिडांगण सभागृह
मिरज ः वैरण बाजार गोदाम सभागृह
इस्लामपूर ः अन्नधान्य गोदाम सभागृह
शिराळा ः गोरक्षनाथ आयटीआय सभागृह
पलूस-कडेगाव ः आयटीआय सभागृह कराड रोड
खानापूर ः फर्टिलिटी सेंटर सभागृह विटा
तासगाव-कवठेमहांकाळ ः गव्हर्मेंट मल्टिपर्जस हॉल
जत ः जुने अन्नधान्य गोदाम सभागृह

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



