दिनेशकुमार ऐतवडे
sangli vidhansabha news : सुधीर गाडगीळांना हॅटट्रिकची संधी : राज्याच्या राजकारणात महत्वाचा जिल्हा म्हणून ओळख असणारा सांगली विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. 1952 पासूनच्या राजकारणात या मतदार संघात आजपर्यंत केवळ वसंतदादा पाटील आणि संभाजी पवार या दोघांनाच आमदारकीची हॅटट्रीक साधता आली आहे. आता आमदार सुधीर गाडगीळांना ही संधी चालून आली आहे.
sangli vidhansabha news : सुधीर गाडगीळांना हॅटट्रिकची संधी
भारतीर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा 1952 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती. पहिल्याच निवडणुकीत स्वातंत्र्यसैनिक असलेल्या वसंतदादांनी काँग्रेसतर्फे उभे राहिले आणि ते निवडून आले. तेथून पुढे त्यांनी 1957 आणि 1962 ला विजयाची हॅट्रीक झाली. त्यानंतर सांगलीत अनेक आमदार झाले परंतु लवकर कोणाला हॅटटृीक साधता आली नाही.
1986 मध्ये वसंतदादा राजस्थानचे राज्यपाल झाले आणि सांगलीची पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत जनता दलातर्फे संभाजी पवार रिंगणात उतरले. त्यांनी विष्णूअण्णांचा पराभव केला. त्यानंतर 1990 आणि 1995 च्या निवडणुकीत ही संभाजी पवार निवडून आले अशा तर्हेने सलग तीन वेळा संभाजी पवार निवडून आले.
आता 2014 च्या निवडणुकीत सुधीर गाडगीळ निवडून आले हाते. 2019 च्या निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली आता पुन्हा एकदा सांगलीतून तिसर्या आमदाराला हॅट्रीक करण्याची संधी निर्माण झाली आहे.
गेल्या दहा वर्षाच्या काळात सुधीरदादांनी सांगली विधानसभेत आपला जम बसविला आहे. भाजपला तळागाळात पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे. आपल्याला आता उमेदवारी नको म्हणून त्यांनी पक्षालाही कळविले होते. परंतु पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वासाने जबाबदारी दिली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.