rajkiyalive

sangli vidhansabha news : सांगलीवाडीच्या विकासाला बळ देणार: पृथ्वीराज पाटील

sangli vidhansabha news : सांगलीवाडीच्या विकासाला बळ देणार: पृथ्वीराज पाटील: सांगलीवाडी महापालिका क्षेत्राचा भाग असली तरी तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. कृष्णाकाठच्या या गावाची रग वेगळी आहे. या गावाच्या विकासाला मी सतत बळ देईन. इथली चिंचबाग, कबड्डीचं आणि होड्यांच्या शर्यतीचं वेड न्यारं आहे. इथली शेती प्रगत आहे. इथल्या तरुणांना आधुनिक सुविधा देण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन, अशी ग्वाही सांगली विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

sangli vidhansabha news : सांगलीवाडीच्या विकासाला बळ देणार: पृथ्वीराज पाटील

सांगलीवाडी येथे त्यांनी प्रचार दौरा केला. वाडीत घरोघरी भेटी दिल्या. लोकांशी संवाद साधला. लोकांनी आपल्या अपेक्षा मांडला. पृथ्वीराज पाटील यांनी त्या पूर्ण करण्याचा त्यांचा आराखडा लोकांसमोर ठेवला. सांगली मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन घेऊन, त्याचा संपूर्ण आराखडा घेऊन मी दहा वर्षे काम करतोय. त्याची दखल गेल्या निवडणूकीत 87 हजार लोकांनी घेतली. यावेळी काँग्रेसने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास साधवला. आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांचे बळ माझ्यासोबत आहे. नाराज जयश्रीताईंची नाराजी दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, की गेली पंधरा वर्षे सांगलीत काँग्रेसचा आमदार नाही. बालेकिल्ला कसा म्हणायचा? आपण पुन्हा एकदा ताकदीने उभे राहू. विकासाला साथ देऊ. सांगली आणि जिल्ह्यात काँग्रेस एकसंध आहे, महाविकास आघाडी एकसंध आहे. सामान्य माणसांच्या रोजच्या जगण्याची मला कल्पना आहे. मायमाऊलींच्या विकासाची शाश्वत दिशा ठरवण्यासाठी बचत गटांना बळ देणे गरजेचे आहे. त्यांना त्यांच्या गावात, घरात रोजगाराच्या संधी देण्याचा आमचा संकल्प आहे. महिला सुरक्षा, शहरातील महिला स्वच्छतागृह यासाठी मी आग्रही व आक्रमक भूमिका घेतली आहे.

यावेळी माजी नगरसेवक दिलीप पाटील, महाबळेश्वर चौगुले, हरिदास पाटील, सच्चीदानंद कदम, उमेश पाटील, आनंदराव पाटील, पी. आर. पाटील, इकबाल तांबोळी, शाहीर पाटील, अभिजित कोळी, मदन पाटील, विष्णू पाटील, रामचंद्र पाटील, छायाताई पाटील, दळवी गुरूजी, कमल गोरे आदी उपस्थित होते

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज