rajkiyalive

SANGLI VIDHANSABHA : सांगली विधानसभेची जागा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाला मिळावी

SANGLI VIDHANSABHA : सांगली विधानसभेची जागा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाला मिळावी

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI VIDHANSABHA : सांगली विधानसभेची जागा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाला मिळावी : सांगली विधानसभेची जागा आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला मिळते पण या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचा सतत पराभव झाला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत सांगलीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार देण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा पदाधिकार्‍यांनी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे केली. खा. पवार यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा करून निर्णय घेण्याची ग्वाही त्यांनी दिली.

SANGLI VIDHANSABHA : सांगली विधानसभेची जागा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाला मिळावी

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष खा. शरद पवार सोमवारी सांगलीच्या दौर्‍यावर आले होते. त्यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, सामाजिक न्याय विभागाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी खा. शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पक्षाच्या सांगली विधानसभा मतदारसंघातील घडामोडीवर चर्चा झाली. यावेळी बोलताना सांगली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन जगदाळे म्हणाले, सांगली लोकसभेची जागा आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला मिळते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामाणिकपणे दिलेल्या उमेदवाराचा काम करतात. आणि निवडणून आणण्यासाठी प्रयत्न करतात.

सांगली विधानसभेची जागा देखील आघाडीच्या जागा वाटपात कायम काँग्रेसलाच मिळते.

मात्र गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार दिनकर पाटील यांचा अपवाद वगळता या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार कधीही निवडून आला नाही. मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला या विधानसभा निवडणुकीत एकमेळ जागा देऊन संधी द्यावी. त्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या बैठकीत हट्ट धरावा, अशी मागणी केली. शहराध्यक्ष सागर घोडके म्हणाले, सांगली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्यावतीने जनतेची कामे केली आहेत. आरोग्य शिबीराच्या माध्यमातून अनेकांना आधार दिला गेला आहे.

मतदारसंघात काम चांगले आहे. भविष्यात सांगलीची जागा मिळाली तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार शंभर टक्के निवडून येईल, असे सांगितले. उत्तम कांबळे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली व शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम चांगले सुरू आहे. त्यामुळे सांगलीची जागा यावेळी मिळावी, अशी मागणी केली. खा. शरद पवार म्हणाले, विधानसभा जागा वाटपाचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होतो, ज्यावेळी चर्चा होईल, त्यावेळी सांगलीच्या विषयावर बाजू मांडू, अशी ग्वाही दिली. यावेळी सेवादलाचे अध्यक्ष महालिंग हेगडे, महिला आघाडीच्या वंदना चंदनशिवे, दत्ता पाटील, निलेश शहा, वाजीद खतीब, पप्पू कोळेकर, जुबरे चौधरी आदी उपस्थित होते.

संजय बजाज यांना उमेदवारीची मागणी…

सांगली विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक झाला आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातून शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी पदाधिकार्‍यांनी खा. शरद पवार यांच्याकडे केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज