पोलिसांनी 16 कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात ; कॅफेतील बंदिस्त जागा केल्या उध्वस्त.
SANGLI : विश्रामबागमधील तीन कॅफे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने फोडले : सांगली : विश्रामबागमधील शंभर फुटी रस्त्यावरील एका कॅफेत गुंगीच्या औषध देवून एका अल्पवयीन मुलावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आज त्याचे संतप्त पडसाद शहरात उमटले. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्याकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शंभरफुटी रस्त्यावील हँग ऑन कॅफेवर सकाळी अकराव वाजता हल्लाबोल केला.
SANGLI : विश्रामबागमधील तीन कॅफे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने फोडले
तेथील बंदिस्त खोल्या मोडून काढत साहित्यांची तोडफोड केली. त्यानंतर एकापाठोपाठ आणखी दोन कॅफेंची तोडफोड करण्यात आली. खरे मंगल कार्यालयाजवळील डेनिस्को आणि कॅफे सनशाईन अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या सोळा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
हँग ऑन’ कॅफेमध्ये कॉफीतून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बालात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शंभरफुटी रस्त्यावरील ‘हँग ऑन’ कॅफेमध्ये कॉफीतून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बालात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संशयित आशिष शरद चव्हाण याच्याविरुद्ध बलात्कार आणि ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज सकाळी अकराच्या सुमारास ‘हँग ऑन’ कॅफेवर हल्लाबोल केला.
जोरदार घोषणाबाजी करत तोडफोड सुरू केली. आतील छोट्या बंदिस्त जागा, सिलिंग उचकटून टाकले. खुर्च्या बाहेर आणून तोडल्या. काचांचा चक्काचूर करून टाकला. फर्निचरसह बाहेरील फलक फोडून टाकला. अवघ्या काही मिनिटात कॅफे उध्वस्त करून टाकला. तेवढ्यात विश्रामबाग पोलिस घटनास्थळी आले. त्यांची चौकशी सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी विश्रामबाग चौक परिसरात खरे मंगल कार्यालयाजवळील इमारतीतील कॅफेवर हल्लाबोल केला. एकाच इमारतीमध्ये असलेल्या डेनिस्को आणि कॅफे सनशाईनमध्ये घुसून सर्व बंदिस्त जागा उध्वस्त करून टाकल्या. फर्निचर, खुर्च्यासह साहित्याची तोडफोड केली.
तोडफोड करणार्या 16 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही मुल-मुलीही याठिकाणी होते. बघ्यांची मोठी गर्दी परिसरात झाली होती. दरम्यान, विश्रामबाग पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी तोडफोड करणार्या 16 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणले. घटनेची माहिती मिळताच अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.
पाच हजारांचे पोलिसांना हप्ते ; कारवाईला टाळाटाळ? : रणजीत चव्हाण.
सांगलीतील अनेक कॅफे मिनी लॉज बनले आहेत. येथे लैंगिक चाळ्यासाठी बंदिस्त जागा दिल्या जातात. हे कॅफे बंद करण्यासाठी संघटनेने विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्यासह गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहे. परंतू पोलिस शहरातील प्रत्येक कॅफे चालकांकडून तीन ते पाच हजार रुपयांचे हप्ते घेत असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे रणजीत चव्हाण यांनी केला. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागले. यापुढेही कॅफेत गैरप्रकार सुरु राहिल्यास तोडफोड केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कॅफेत अंधार्या खोल्या, प्रायव्हेट रूम आणि बंदिस्त जागा..
कॅफेंची तोडफोड झाल्यानंतर पाहणी केली असता काही कॅफेंमध्ये एकांतासाठी अंधार्या खोल्या आणि बंदिस्त जागा दिसून आल्या. विश्रामबागमधील सनसाईन कॅफेत तर धक्कादायक गोष्टी दिसून आल्या. अन्यत्र ठिकाणी छोट्या छोट्या बंदिस्त जागा आणि काही अक्षेपार्ह गोष्टी दिसून आल्या. आता पोलिस कोणती कारवाई करणार याकडे लक्ष आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.