सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर ; विटा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचार सुरू
sangli-vita-news : विट्यातील शासकीय निवासी शाळेत 24 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा : समाजकल्याण विभागाच्या विटा येथील शासकीय निवासी शाळेतील 24 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांना तातडीनं विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून सर्व विद्यार्थ्यांवर विटा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत.
sangli-vita-news : विट्यातील शासकीय निवासी शाळेत 24 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
जेवणातून 24 मुलांना विषबाधा झाल्याच्या घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे विटा शहरासह सांगली जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे. विटा येथील साळशिंगे रस्त्यावरील आयटीआय कॉलेज शेजारी समाजकल्याण विभागाची शासकीय निवासी शाळा आहे. या शाळेत एकूण विद्यार्थी 93 शिकतात. दररोजप्रमाणे रविवारी दुपारी
शाळेकडून 49 विद्यार्थ्यांना मटणाचे जेवण देण्यात आले होते. त्यानंतर दुपारी चार वाजता नाष्ट्यासाठी कलिंगड आणि दूध दिले होते. रात्री सात वाजता नेहमीप्रमाणे चपाती आमटीचे जेवण दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांना आज सोमवारी सकाळपासून उलटी, मळमळ, जुलाबचा त्रास सुरु झाला. एकाचवेळी 24 विद्यार्थ्यांना त्रास सुरु झाल्यामुळे शाळा प्रशासनाने तातडीने विद्यार्थ्यांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोटदुखी उलटीचा त्रास होऊ लागल्याने शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक त्रास होणार्या 5 विद्यार्थ्यांना घेऊन उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले होते.
त्यानंतर डॉक्टराना शंका आल्याने विद्यार्थ्यांकडून चौकशी केली असता दुपारी खालेल्या जेवणातील मटणातून विषबाधा झाली असल्याचे प्रथमर्शनी निष्पन्न झाले असून त्या 24 विद्यार्थ्यांवर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थी सुरज प्रकाश जाधव (वय 16), श्रवणकुमार विठ्ठल बागडे (वय 17), सुरज किसन साठे (वय 15), आदित्य आनंदा रोकडे (वय 16), निर्मल किशोर सावंत (वय 14), स्मित सुभाष झिमरे (वय 12), योगेश बिरुदेव मोटे (वय 13), शुभम प्रकाश माळवे (वय 14), हर्षवर्धन सुनील गायकवाड (वय 13), तेजस सचिन काटे (वय 15), आदित्य कैलास लोखंडे (वय 16), आरूष संजय सकट (वय 12), यश विजय सकट (वय 12), श्रीवर्धन प्रवीण माने (वय 11), प्रज्वल शशिकांत शिंदे (वय 16), सिद्धार्थ जित्ताप्पा बनसोडे (वय 13), आयुष नामदेव सावंत (वय 13), तन्मय प्रकाश निकाळजे (वय 14), सक्षम दिनकर सुखदेव (वय 14), संदीप सुदर्शन सातपुते (वय 14), प्रणव सुर्यकांत उबाळे (वय 16), अभिषेक गौतम डोळसे (वय 12), चैतन्य शशिकांत शिंदे (वय 12), सक्षम तानाजी चंदनशिवे (वय 15) अशी या उपचार सुरू असणार्या विद्यार्थ्यांची नावे असून सध्या त्यांच्यावर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच आमदार सुहास बाबर यांनी तातडीने विटा ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आधार दिला. विटा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडून तातडीने उपचार सुरू करण्याची तसेच शासकीय निवासी शाळेत डॉक्टरांची टीम पाठवून उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना विट्यात बोलवून विद्यार्थ्याच्या उपचाराकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले.
दरम्यान प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी विटा ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीचा विचारपूस केली. तातडीने त्याचा अहवाल देण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना व प्रशासनाला दिल्या.
अन्न व औषध प्रशासनाचे वरातीमागून घोडे
शासकीय निवासी शाळेतील 24 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास लक्षात आली होती. त्यानंतर या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित विभागप्रमुख असणार्या अधिकार्यांना देण्यात आली होती. मात्र कार्यतत्पर असणार्या अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित विभागप्रमुख असणार्या अधिकार्यांनी विटयात स्वतः न उपस्थित राहता थेट प्रभारी अधिकार्यांना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाठवले. या प्रभारी अधिकार्यांनी वरातीमागून घोडे दामटवत आमच्या विभागाचे आम्ही केले असल्याचा दावा छातीठोकपणे केला.
मात्र आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांपुढे या अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित दोन प्रभारी अधिकार्यांची उत्तरे देताना मात्र चांगलीच पंचाईत झाली होती. परंतु अन्न व औषध प्रशासनाचे विभागप्रमुख अधिकारी विटयाला का फिरकले नाहीत ? याचीच चर्चा आहे

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



